दिवाळे, सारसोळे, वाशीतील 460 मच्छीमारांना मिळणार नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:08 PM2020-12-16T23:08:22+5:302020-12-16T23:08:33+5:30

न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पातील बाधित : मंदा म्हात्रे यांचा पुढाकार

Compensation will be given to 460 fishermen in Diwali, Sarsole and Vashi | दिवाळे, सारसोळे, वाशीतील 460 मच्छीमारांना मिळणार नुकसान भरपाई

दिवाळे, सारसोळे, वाशीतील 460 मच्छीमारांना मिळणार नुकसान भरपाई

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: न्हावासेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे आणि वाशी येथील मच्छीमारांना लवकरच नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या संदर्भात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ.के.एच. गोविंदराज यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार, लवकरच नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन के.एच. गोविंदराज यांनी दिल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले .
एमएमआरडीएच्या बहुचर्चित न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे, वाशी येथील मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार आहे. या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी गेल्या वर्षी संबधित विभागाकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी अलीकडेच एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ.के.एच. गोविंदराज यांची भेट घेऊन चर्चा केली. एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या ४६0 मच्छीमारांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्यानुसार, या संदर्भात पंधरा दिवसांत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीकडून स्पष्ट करण्यात आल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. दोन टप्प्यात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ अभियंता गणेश देशपांडे, भाजप युवामोर्चा महामंत्री जगन्नाथ कोळी, अनंता बोस, तुकाराम कोळी, प्रेमनाथ कोळी, सुनील बाये, कैलास कोळी, ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.

सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मागील दीड वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील मच्छीमारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मच्छीमारांची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी आपली भूमिका आहे. त्यानुसार, एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, पुढील पंधरा दिवसांत टप्प्याटप्प्याने भरपाई वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.    -मंदा म्हात्रे, आमदार
 

Web Title: Compensation will be given to 460 fishermen in Diwali, Sarsole and Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.