पनवेल : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मनसेने शासनाच्या निषेधार्थ खड्डे मोजण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात माहितीसाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे.पावसाळ्याच्या सुरवातीलाच महामार्गावर खड्डे पडले आहेत. खड्ड्याचा आकार गोल, चौकोनी, त्रिकोणी, काटकोनी असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखद अनुभव येत असल्याचे उपहासात्मकरीत्या गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या स्पर्धेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितीत लावली असेही निमंत्रण पोलसानी यांनी दिले आहे . खड्ड्यामुळे मनसेने या महामार्गाचे नामांतर नरेंद्र ते देवेंद्र असे केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे मोजण्याची स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:57 PM