अधिकाऱ्याकडून तक्रारदाराला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:47 PM2019-09-17T23:47:50+5:302019-09-17T23:47:56+5:30
एमआयडीसीच्या भूमापन अधिका-याने तक्रारदाराच्या वडिलांना धमकावल्याचा प्रकार महापे येथे घडला आहे.
नवी मुंबई : एमआयडीसीच्या भूमापन अधिका-याने तक्रारदाराच्या वडिलांना धमकावल्याचा प्रकार महापे येथे घडला आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीवर चौकशीसाठी तक्रारदाराच्या वडिलांना बोलावले असताना हा प्रकार घडला.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याची तक्रार एका तरुणाने एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली होती. त्या अनुषंगाने तक्रारदाराच्या वडिलांना अधिक चौकशीसाठी महापे येथील एमआयडीसीच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. त्यानुसार गणेश म्हात्रे हे त्या ठिकाणी गेले असता, ज्या अधिकाºयाविरोधात तक्रार होती तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आपल्याविरोधात केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आपल्याला तसेच आपल्या मुलाला धमकावल्याचा आरोप गणेश म्हात्रे यांनी केला आहे. तसेच मंत्र्याला फोन करून तुमच्याकडे बघायला सांगतो, अशीही धमकी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.