नवी मुंबई : महानगरपालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकामासाठी नोटीस देतात व नंतर पैसे घेऊन तडजोडी करत आहेत. याविषयी ऐरोलीमधील नागरिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन शासनाने महापालिकेला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.ऐरोलीमध्ये राहणाऱ्या महेश वाघमारे यांनी याविषयी शासनाकडे लेखी तक्रार केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे कारण सांगून नागरिकांना कारवाईसाठी नोटीस देत आहेत. एखाद्याचे घर बंद असले तरी पूर्वसूचना न देता कारवाई करत आहेत. शेतकरी बाजारातील विक्रेत्यांनाही त्रास देत आहेत. दोन वर्षांमध्ये एमआरटीपीअंतर्गत अनेकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. या सर्व नोटीसची चौकशी करण्यात यावी. नोटीस दिलेल्या नागरिकांकडून तडजोडी केल्या आहेत का याचाही तपास केला जावा. गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये अधिकाºयांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांकडे ३० आॅगस्टला तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास विभागाचे अव्वर सचिव नवनाथ राठ यांनी महापालिकेला पत्र दिले आहे. या तक्रारीमध्ये केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यात यावी. अतिक्रमण विभागामध्ये अधिकाºयांचे रॅकेट सुरू आहे का याविषयी चौकशी करून ई मेलवर तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अतिक्रमण विभागाच्या कारभाराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:14 AM