‘स्वदेश’च्या पाणीपुरवठा योजनेबाबत तक्रार

By admin | Published: May 6, 2017 06:07 AM2017-05-06T06:07:17+5:302017-05-06T06:07:17+5:30

स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून महाडमध्ये अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू

Complaint about 'Swadesh' water supply scheme | ‘स्वदेश’च्या पाणीपुरवठा योजनेबाबत तक्रार

‘स्वदेश’च्या पाणीपुरवठा योजनेबाबत तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून महाडमध्ये अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. स्वदेशच्या ठेकेदारामार्फत कमी गुणवत्तेचा पाइप वापरल्याचा आरोप सुरू असतानाच बुधवारी महाड तालुक्यातील वारंगी ग्रामपंचायतीने गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत महाड प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये स्वदेश फाउंडेशन अधिकारी, कर्मचारी, इंजिनीअर आणि ठेकेदार यांनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.
किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या वारंगी गावामध्ये सात वाड्यांसाठी स्वदेश फाउंडेशनमार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ९४० लोक संख्या असलेल्या या गावासाठी कुटुंबांना या योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जाणार आहे. हनुमानवाडी, मलईवाडी, वलईवाडी, रामवाडी, दत्तवाडी आणि दोन बौद्धवाड्या अशा भागात हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून साठवण टाकीचे बांधकाम मुख्य पाइपलाइन आणि डिस्ट्रिब्युशन लाइनचे काम करण्यात आले आहे. यावर एकूण ३२ लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी २७ लाख स्वदेशच्या सी.एस.आर. फंडातून तर उर्वरित ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून खर्ची टाकले जाणार आहेत, अशी संपूर्ण योजना आहे.
फेब्रुवारी २०१६मध्ये सुरू झालेली ही योजना अजूनही शंभर टक्के पूर्ण झालेली नाही. तपासणी परिस्थिती असतानाच पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी गळती आढळली आहे. यामुळे व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी या योजनेच्या कामावर आपला आक्षेप नोंदवला आहे. बुधवारी महाडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि महाड तालुका पोलीस ठाणे यांच्याकडे ६२ ग्रामस्थांच्या सह्यांचा तक्रारी अर्ज स्वदेश फाउंडेशनच्या विरोधात दाखल केला आहे. या अर्जामध्ये गावातील भौगोलिक परिस्थिती न पाहता काम केले. कमी इंची पाइपलाइन टाकणे, पाणीटंचाई भासल्यास जबाबदारी आम्ही घेऊ, असे खोटे आश्वासन दिले. असे या अर्जात नमूद केले आहेत. या पाणीपुरवठा योजने प्रकरणी वारंगी ग्रामस्थांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

स्वदेश फाउंडेशनमार्फत योजना राबवत असताना नवीन स्वतंत्र विहीर आणि लोखंडी पाइपलाइनचा आग्रह आम्ही केला होता. मात्र, जुन्या विहिरीवर योजना राबवित प्लास्टिकची पाइपलाइन टाकण्यात आली. २०१६च्या पावसात नदीपात्रातील पाइपलाइन नदीपात्रातील पाइपलाइन वाहून गेली असून, अनेक ठिकाणी गळती लागली आहे. स्वदेश फाउंडेशनकडे याची तक्रार केली आहे. त्याचे निराकरण व्हावे, आम्ही लोकवर्गणी भरली आहे. त्यामुळे आमची पूर्ण योजना सुस्थितीत करून देण्यात यावी.
-संजना दाभोळकर, सरपंच वारंगी

ठरल्याप्रमाणे योजनेचे काम करण्यात आले आहे. नवीन विहीर हा विषय मंजुरीमध्ये नव्हता, तर जी. आय.पी. पाइप स्वदेश कधीच वापरत नाही. त्यामुळे सुरू असलेले काम हे नियमानुसार आहे. पाणीप्रश्न नाही, तर पाण्याचा दाब कमी-जास्त होत आहे. याबाबत बैठक घेऊन ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे. पुढील आठवड्यात पाइपलाइनच्या तपासणीचे काम सुरू करण्यात येईल.
-नजीर शिक लगार,
व्यवस्थापक, स्वदेश फाउंडेशन

Web Title: Complaint about 'Swadesh' water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.