शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘स्वदेश’च्या पाणीपुरवठा योजनेबाबत तक्रार

By admin | Published: May 06, 2017 6:07 AM

स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून महाडमध्ये अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून महाडमध्ये अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. स्वदेशच्या ठेकेदारामार्फत कमी गुणवत्तेचा पाइप वापरल्याचा आरोप सुरू असतानाच बुधवारी महाड तालुक्यातील वारंगी ग्रामपंचायतीने गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत महाड प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये स्वदेश फाउंडेशन अधिकारी, कर्मचारी, इंजिनीअर आणि ठेकेदार यांनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या वारंगी गावामध्ये सात वाड्यांसाठी स्वदेश फाउंडेशनमार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ९४० लोक संख्या असलेल्या या गावासाठी कुटुंबांना या योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जाणार आहे. हनुमानवाडी, मलईवाडी, वलईवाडी, रामवाडी, दत्तवाडी आणि दोन बौद्धवाड्या अशा भागात हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून साठवण टाकीचे बांधकाम मुख्य पाइपलाइन आणि डिस्ट्रिब्युशन लाइनचे काम करण्यात आले आहे. यावर एकूण ३२ लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी २७ लाख स्वदेशच्या सी.एस.आर. फंडातून तर उर्वरित ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून खर्ची टाकले जाणार आहेत, अशी संपूर्ण योजना आहे.फेब्रुवारी २०१६मध्ये सुरू झालेली ही योजना अजूनही शंभर टक्के पूर्ण झालेली नाही. तपासणी परिस्थिती असतानाच पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी गळती आढळली आहे. यामुळे व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी या योजनेच्या कामावर आपला आक्षेप नोंदवला आहे. बुधवारी महाडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि महाड तालुका पोलीस ठाणे यांच्याकडे ६२ ग्रामस्थांच्या सह्यांचा तक्रारी अर्ज स्वदेश फाउंडेशनच्या विरोधात दाखल केला आहे. या अर्जामध्ये गावातील भौगोलिक परिस्थिती न पाहता काम केले. कमी इंची पाइपलाइन टाकणे, पाणीटंचाई भासल्यास जबाबदारी आम्ही घेऊ, असे खोटे आश्वासन दिले. असे या अर्जात नमूद केले आहेत. या पाणीपुरवठा योजने प्रकरणी वारंगी ग्रामस्थांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्वदेश फाउंडेशनमार्फत योजना राबवत असताना नवीन स्वतंत्र विहीर आणि लोखंडी पाइपलाइनचा आग्रह आम्ही केला होता. मात्र, जुन्या विहिरीवर योजना राबवित प्लास्टिकची पाइपलाइन टाकण्यात आली. २०१६च्या पावसात नदीपात्रातील पाइपलाइन नदीपात्रातील पाइपलाइन वाहून गेली असून, अनेक ठिकाणी गळती लागली आहे. स्वदेश फाउंडेशनकडे याची तक्रार केली आहे. त्याचे निराकरण व्हावे, आम्ही लोकवर्गणी भरली आहे. त्यामुळे आमची पूर्ण योजना सुस्थितीत करून देण्यात यावी.-संजना दाभोळकर, सरपंच वारंगीठरल्याप्रमाणे योजनेचे काम करण्यात आले आहे. नवीन विहीर हा विषय मंजुरीमध्ये नव्हता, तर जी. आय.पी. पाइप स्वदेश कधीच वापरत नाही. त्यामुळे सुरू असलेले काम हे नियमानुसार आहे. पाणीप्रश्न नाही, तर पाण्याचा दाब कमी-जास्त होत आहे. याबाबत बैठक घेऊन ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे. पुढील आठवड्यात पाइपलाइनच्या तपासणीचे काम सुरू करण्यात येईल. -नजीर शिक लगार,व्यवस्थापक, स्वदेश फाउंडेशन