- मयूर तांबडे पनवेल : शहरातील टोइंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांवर हुज्जत घालणे एका तरु णाला चांगलेच महाग पडणार असून वाहतूक पोलिसांनी त्या तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हितेश नाईक (कोल्ही) असे या तरुणाचे नाव असून, शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.शहरात नो पार्किंग क्षेत्रात गाडी पार्क केल्यास टोइंग व्हॅन कारवाई करत असते. नो पार्किंगमध्ये असणारी वाहने ही टोइंग व्हॅन उचलून छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील वाहतूक नियंत्रण शाखेत आणते व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करते. शुक्र वारी १३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे टोइंग व्हॅन पनवेल शहरातून चालली होती. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उरण नाका परिसरात मोठ्या संख्येने वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे टोइंग व्हॅनवर कार्यरत असणारे पोलीस हवालदार आर. बनसोडे यांनी उरण नाका परिसरातील नो पार्किंग झोनमधील काही दुचाकी उचलल्या. त्याचबरोबर याठिकाणी लागलेली एक इनोव्हा कारही नो पार्किंगमध्ये लागली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नो पार्किंगमध्ये कार लावली असल्याने त्या कारला जॅमर लावण्यात आले. तेवढ्यात एक जण तेथे आला. गाडीला जॅमर लावू नका, असे म्हणत तो पोलिसांशी हुज्जत घालू लागला. तो काही केल्या पोलिसांना ऐकत नव्हता. बघता बघता त्यांच्यातील वाद वाढत गेला व मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली. शेवटी वाहतूक पोलिसाने ती गाडी दंड न घेताच सोडून दिली. घडलेला सारा प्रकार या वाहतूक पोलिसांनी पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांना सांगितला. त्यानुसार सोमवारी १६ जुलै रोजी हुज्जत घालणाºया या युवकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात वाहतूक पोलीस आर. बनसोडे यांच्यातर्फे तक्र ार देण्यात आली.>वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणाºया तरुणाच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करणार आहोत.- अभिजित मोहिते,वाहतूक पोलीस निरीक्षक
पनवेलमध्ये पोलिसांसोबत भांडण करणाऱ्याविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:06 AM