सिडको अधिकाऱ्याला धमकीप्रकरणी प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:04 AM2018-05-12T02:04:58+5:302018-05-12T02:04:58+5:30
एप्रिल महिन्यात सिडकोने कामोठे गावात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते.
पनवेल : एप्रिल महिन्यात सिडकोने कामोठे गावात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित सिडको अधिकाºयाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधित अधिकाºयांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सिडकोकडून अहवाल मागवण्यात आला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कामोठे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागात कार्यरत असलेले अधिकारी विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बांधकाम तोडण्यात आले. सिडकोने या जागेवर साडेबारा टक्केच भूखंड वसविले असल्याने सिडकोने संबंधित बांधकाम हटविले. दरम्यान, ही बाब येथील प्रकल्पग्रस्तांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ कामोठेत धाव घेतली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांच्या दालनात सिडको अधिकारी, पोलीस व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह बैठक त्याच दिवशी १७ एप्रिल रोजी पार पडली.
कारवाईसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकाºयांना जाब विचारण्यास सुरवात केली. यावेळी त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप संबंधित अधिकाºयांनी केला. याप्रकरणी त्यांनी लेखी पत्रही त्याच दिवशी कामोठे पोलीस ठाण्यात दिले आहे. मात्र, यासंदर्भात कामोठे पोलिसांनी या घटनेचा तपास करून संबंधितांवर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
कामोठे पोलिसांनी सिडकोकडे यासंदर्भात अहवाल मागविला असून तसा पत्रव्यवहारही झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी. एम. देशमुख यांनी दिली.
सिडको अधिकाºयाला जीवे ठार मारण्याच्या धमकीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. येथील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न जटील आहे. संबंधित ठिकाणी प्रकल्पग्रस्त राहत होते. त्यांचे लग्न कार्य देखील त्याठिकाणी पार पडलेले आहेत. त्या कार्याचे फोटो देखील प्रकल्पग्रस्तांकडे उपलब्ध असून सिडको असे राहते घर कसे काय तोडू शकते? संबंधित अधिकाºयाला अशाप्रकारची कारवाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा आमदार प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी केला असून पोलिसांनी अद्याप संपर्ककेला नसल्याचेही स्पष्ट केले.