म्हाडाच्या संचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 02:26 PM2019-03-17T14:26:38+5:302019-03-17T14:45:49+5:30

म्हाडाचे संचालक मंगेश एकनाथ सांगळे यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ऐरोली येथील इमारतीमधील 19 वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची माहिती मिळाली आहे.

complaint of molestation filed against Mhada's director | म्हाडाच्या संचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

म्हाडाच्या संचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देम्हाडाचे संचालक मंगेश एकनाथ सांगळे यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.ऐरोली येथील इमारतीमधील 19 वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अद्यापही सांगळे यांना अटक केली नसल्याचा संताप पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.

नवी मुंबई - म्हाडाचे संचालक मंगेश एकनाथ सांगळे यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ऐरोली येथील इमारतीमधील 19 वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी अद्याप सांगळे विरोधात कारवाई केलेली नाही.

माजी आमदार व विद्यमान म्हाडाचे संचालक मंगेश सांगळे हे ऐरोली सेक्टर 8 येथे राहतात. ते राहत असलेल्या इमारतीमधील  एका 19 वर्षीय मुलीला त्यांनी कामानिमित्ताने घरी बोलवले होते. यावेळी घरात इतर कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी मुलीसोबत अश्लील चाळे केले. मात्र मुलीने सांगळे यांच्या तावडीतून स्वतः ची सुटका करून घेतली. यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली असता त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानुसार सांगळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही सांगळे यांना अटक केली नसल्याचा संताप पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. तर सांगळे यांना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी संधी मिळावी यासाठी पोलिसांकडून अप्रत्यक्ष सहकार्य केले जात असल्याचाही आरोप होत आहे. 

Web Title: complaint of molestation filed against Mhada's director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.