नवी मुंबई महापालिकेला ‘आरटीआय’चे वावडे; माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 06:57 AM2024-07-07T06:57:08+5:302024-07-07T06:57:38+5:30

नवी मुंबई महापालिकेविरोधात राज्य माहिती आयुक्तांच्या कोकण खंडपीठाकडे तक्रार

Complaint of Navi Mumbai Municipal Corporation to Konkan Bench of State Information Commissioner | नवी मुंबई महापालिकेला ‘आरटीआय’चे वावडे; माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल

नवी मुंबई महापालिकेला ‘आरटीआय’चे वावडे; माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल

नवी मुंबई : महापालिकेने माहिती अधिकार कायदा धाब्यावर बसविला असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते सुधीर दाणी  यांनी राज्य माहिती आयुक्तांच्या कोकण खंडपीठाकडे केली आहे. 

द्वितीय अपीलाच्या सुनावणीत अर्जदाराने मागितलेली संपूर्ण माहिती १५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश जनमाहिती अधिकाऱ्यांनी २७ मे रोजी महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, एक महिना उलटून गेला तरी ती देण्यास संबंधित विभागाने चालढकल केली असल्याची त्यांची तक्रार आहे. 
करदात्या नागरिकांसमोर समोर महापालिकेचा कारभार खुला आणि पारदर्शक असला पाहिजे. त्यामुळे  याप्रकरणी कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी दाणी यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे केली आहे. 

एकाही अर्जाची दखल घेतलेली नाही

सजग नागरिक मंचाने मागील काही महिन्यांत विविध सामाजिक तथा नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक माहिती अधिकार अर्ज महापालिकेकडे दाखल केले आहेत. परंतु, यापैकी एकाही अर्जावर कार्यवाही झालेली नाही. यामुळे या काळात आरटीआयचे किती अर्ज दाखल झाले आणि त्यापैकी किती अर्जांना महापालिकेने उत्तर दिले, किती अर्जांवर सुनावणी घेऊन आदेश पारित केले, याचा लेखाजोखा मागवावा, अशी विनंतीही त्यांनी कोकण खंडपीठाकडे केली आहे.
 

Web Title: Complaint of Navi Mumbai Municipal Corporation to Konkan Bench of State Information Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.