खंडणीखोर कर्मचाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 12:25 AM2021-02-07T00:25:10+5:302021-02-07T00:25:29+5:30

खारघर अतिक्रमण विभागातील संतोष ठाकूर

Complaint of ransom workers to the Governor | खंडणीखोर कर्मचाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार

खंडणीखोर कर्मचाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार

Next

पनवेल : शिपाई असलेल्या खारघर अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याविरोधात खंडणीचा आरोप करीत थेट राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे. संतोष ठाकूर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून एक हजाराच्या खंडणीसाठी सुमारे ४० हजारांचा भाजीपाला भरलेला टेम्पो ठाकूर याने जप्त केल्यानंतर तक्रारदार संजय लाखे यांनी या विषयाला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयापासून राज्यपालांकडे ठाकूर याची लेखी तक्रार केली आहे.

अपंग असलेल्या संजय लाखे हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी टेम्पो चालवतात. नोव्हेंबरमध्ये खारघर शहरात रस्त्याच्या कडेला असाच टेम्पो पार्क केला असता तत्कालीन अतिक्रमण विभागातील कर्मचारी संतोष ठाकूरने येऊन लाखे यांना शिवीगाळी करीत हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास टेम्पो जप्त करण्याची धमकीही दिली. पैसे नसल्याने ठाकूरने भाजीपाला भरलेला टेम्पो जप्त केला. प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांच्या आदेशाने ही कारवाई केली गेली असल्याचे संतोष ठाकूर याने सांगितले. दिवसभर टेम्पो जप्त केल्याने ४० हजार रुपयांचा भाजीपाला वाया गेल्याने लाखे यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई मागत संतोष ठाकूरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. याकरिता लाखे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

पालिका आयुक्तांपासून, मुख्यमंत्री कार्यालयासह थेट राज्यपालांकडे मागणी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी याप्रकरणी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पालिका आयुक्तांना याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

प्रभाग अधिकाऱ्यांकडून पांघरूण घालण्याचा प्रयत्न : यासंदर्भात प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांना विचारणा केली असता या विषयावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत. संबंधित टेम्पोचालक संजय लाखे यांनीच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. खंडणीचा आरोप असलेल्या संतोष ठाकूरची अतिक्रमण विभागातून बदली करण्यात आल्याचे भंडारी यांनी सांगितले.
 

Web Title: Complaint of ransom workers to the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.