शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खंडणीखोर कर्मचाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 12:25 AM

खारघर अतिक्रमण विभागातील संतोष ठाकूर

पनवेल : शिपाई असलेल्या खारघर अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याविरोधात खंडणीचा आरोप करीत थेट राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे. संतोष ठाकूर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून एक हजाराच्या खंडणीसाठी सुमारे ४० हजारांचा भाजीपाला भरलेला टेम्पो ठाकूर याने जप्त केल्यानंतर तक्रारदार संजय लाखे यांनी या विषयाला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयापासून राज्यपालांकडे ठाकूर याची लेखी तक्रार केली आहे.अपंग असलेल्या संजय लाखे हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी टेम्पो चालवतात. नोव्हेंबरमध्ये खारघर शहरात रस्त्याच्या कडेला असाच टेम्पो पार्क केला असता तत्कालीन अतिक्रमण विभागातील कर्मचारी संतोष ठाकूरने येऊन लाखे यांना शिवीगाळी करीत हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास टेम्पो जप्त करण्याची धमकीही दिली. पैसे नसल्याने ठाकूरने भाजीपाला भरलेला टेम्पो जप्त केला. प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांच्या आदेशाने ही कारवाई केली गेली असल्याचे संतोष ठाकूर याने सांगितले. दिवसभर टेम्पो जप्त केल्याने ४० हजार रुपयांचा भाजीपाला वाया गेल्याने लाखे यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई मागत संतोष ठाकूरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. याकरिता लाखे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.पालिका आयुक्तांपासून, मुख्यमंत्री कार्यालयासह थेट राज्यपालांकडे मागणी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी याप्रकरणी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, पालिका आयुक्तांना याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.प्रभाग अधिकाऱ्यांकडून पांघरूण घालण्याचा प्रयत्न : यासंदर्भात प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांना विचारणा केली असता या विषयावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत. संबंधित टेम्पोचालक संजय लाखे यांनीच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. खंडणीचा आरोप असलेल्या संतोष ठाकूरची अतिक्रमण विभागातून बदली करण्यात आल्याचे भंडारी यांनी सांगितले. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी