गाढी नदीवरील पुलाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:09 AM2018-10-27T00:09:10+5:302018-10-27T00:09:14+5:30
पनवेल शहरातील वाहतूककोंडीचे ग्रहण लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल शहरातील वाहतूककोंडीचे ग्रहण लवकरच सुटण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर पनवेलमधून सुमारे तीन पूल व एक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, पैकी गाढी नदीवरील काम पूर्णत्वास आल्याने लवकरच याठिकाणी चालकांची रखडपट्टी दूर होणार आहे.
एमएसआरडीसीअंतर्गत हे काम केले जात आहे. महामार्गाचे रु ंदीकरण व नव्याने तीन पूल बांधण्याच्या कामाला मागील वर्षभरापासून सुरु वात करण्यात आली आहे. सुमारे ३९ कोटी निधी खर्चून या मार्गावर ३ नवीन पूल व १ भुयारी मार्ग बांधण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे खांदा वसाहत सिग्नल व पंचमुखी हनुमान मंदिर याठिकाणीही असलेली नित्याची वाहतूककोंडी देखील संपुष्टात येणार आहे. खांदा वसाहत येथील उड्डाणपुलाचे कामही सध्या वेगाने सुरू आहे. अनेक वर्षे याठिकाणच्या एकाच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. पनवेल शहरात प्रवेश करणारा हा एकच मार्ग असल्याने याठिकाणच्या पुलाचे रु ंदीकरण होणे आवश्यक होते. टीआयपीएल कंपनीमार्फत हे काम करण्यात येत आहे .
१ फेब्रुवारी २०१७ रोजी या मार्गावर कामाला सुरु वात करण्यात आली आहे. यापैकी काळुंद्रे येथील पुलाचे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी या पुलाखालून गेल्याने या जलवाहिनीच्या अडथळ्यामुळे हे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अडथळ्यामुळे या कामाची मुदत २५ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशी माहिती एमएसआरडीसीचे अधिकारी एस गांगुर्डे व अधीक्षक अभियंता पी . औटी यांनी दिली .
>काळुंद्रे पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार
काळुंद्रे पुलाखालून एमजेपीची जलवाहिनी गेली आहे. ही जलवाहिनी हटविण्यासाठी लागणाऱ्या उशिरामुळे या पुलाचे काम रखडले आहे. मात्र, एमएसआरडीसीमार्फत ही जलवाहिनी न हटवता पर्यायी विचार करून पुलाचे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने २0१९ च्या सुरु वातीला हे काम देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.