देशभरातील महापौरांकडून कौतुक
By admin | Published: May 21, 2017 03:24 AM2017-05-21T03:24:53+5:302017-05-21T03:24:53+5:30
शातील विविध महापालिकांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी नवी मुंबई महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेत, महापालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देशातील विविध महापालिकांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी नवी मुंबई महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेत, महापालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
विविध विकासकामांच्या माध्यमातून, तसेच मिळालेल्या पुरस्कारांमुळे नवी मुंबई महापालिकेचा सध्या देशभरात नावलौकिक होत आहे. त्यामुळे अनेकांना नवी मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धती व ध्येय धोरणांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे. त्यामध्ये इतर ठिकाणच्या राजकीय व्यक्तींसह शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या उद्देशाने गतकाळात अनेकांनी महापालिकेला भेटही दिलेली आहे. अशातच शनिवारी देशातील विविध महापालिकांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने महापालिकेला भेट दिली. या वेळी महापौर सुधाकर सोनावणे, सभागृहनेते जयवंत सुतार यांनी त्यांना पालिकेच्या संपूर्ण विकासकामांची माहिती दिली. पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत नवी मुंबईतल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेची व अत्याधुनिक सेवा-सुविधांची माहिती घेऊन प्रत्यक्षात पाहणीही केली. या वेळी पंजाबमधील जालंदरचे महापौर सुनील ज्योती, लुधियानाचे महापौर हरचरण सिंग गोहलवाडीया, छत्तीसगढमधील रायपूरचे महापौर प्रमोद दुबे, बिलासपूरचे महापौर किशोर राय, सिक्कीम मधील गंगटोकचे महापौर शक्ती सिंग, मध्यप्रदेशमधील रेवाच्या महापौर ममता गुप्ता, देवासचे महापौर सुभाष शर्मा, आंध्रप्रदेशमधील अनंतपूरचे महापौर एम. स्वरूपा, गंगटोकचे आयुक्त शेवांग गायछो आदी उपस्थित होते. त्यांनी महापालिका मुख्यालयाची पाहणी करून आवारातील २२५ फूट उंचीचा प्रतीकात्मक राष्ट्रध्वज व इतर बाबी प्रभावीत करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले.
यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकाल्पांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. पाणीवितरण, घनकचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता अभियान व ईटीसी केंद्र आदी प्रकल्पांना
विविध स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.