शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

राज्यातील राजकीय नाट्याविषयी नवी मुंबईत संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 2:07 AM

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई, पनवेल : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवी मुंबईसह पनवेल, उरणमध्ये या घटनेच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे शुक्रवारी जवळपास निश्चीत झाले होते. नवी मुंबई, पनवेल परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु पहाटेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शपथ घेतल्याचे वृत्त समजताच शिवसेना पदाधिकाऱ्यांना धक्का बसला. समाज माध्यमातून सत्तास्थापनेच्या प्रकाराविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्याचे टाळले. परंतु दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाºयांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.नवी मुंबईमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्ता स्थापनेचा जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला होता. सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येईल अशा प्रतिक्रिया काही पदाधिकाºयांनी व्यक्त केल्या. भाजपला विश्वास दर्शक ठराव जिंकता येणार नाही अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.राज्याचे राजकारण खालच्या स्तराला चालू आहे. निवडणुका पार पडल्यापासून राज्यात चारही पक्षांची नौटंकी सुरु असून जनतेला आणि शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. यामुळे राज्याच नाव देशात खराब होत असून आता हे बस झाल अशी राज्यातील सर्वसामान्य जनतेची देखील प्रतिक्र या आहे.- गजानन काळे, मनसे शहराध्यक्ष, नवी मुंबई

राज्यात अतिशय चांगले वातावरण आहे. शेतकºयांच्या हितासाठी अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला पुन्हा स्थिर सरकार मिळणार असून राज्यातील जनतेमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.- रामचंद्र घरत, भाजप जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई

सध्या राज्यात काहीही राजकीय घडामोडी घडल्या असतील तरीही राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच सत्ता येणार असून ते राज्याच्या देखील हिताचे आहे. अजित पवार यांनी असं का केलं हे माहीत नाही परंतु राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवार यांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाहीत.- अनिल कौशिक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई

आजची घटना अतिशय दुर्दैवी असून आम्ही सर्व शरद पवार यांच्या बरोबरच आहोत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार असून भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असेल यात शंका नाही.- प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक, नवी मुंबईउरणमध्येही जल्लोष1उरण : जवळपास महिनाभर सुरू असलेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सेना -काँग्रेस-राष्ट्रवादी आदी पक्षांची मिळून महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली असतानाच शनिवारी सकाळी भाजप-राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा नाट्यमयरित्या शपथविधी झाला.2या खळबळजनक सत्ता स्थापनेनंतर उरण विधानसभा मतदारसंघात काही राजकीय पक्षात कई खुशी, कई गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र सत्ता स्थापनेनंतर उरणमध्ये भाजपने आमदार महेश बादली यांच्या नेतृत्वाखाली शहरातून विजयी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करून विजयी जल्लोष केला. या जल्लोषात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.3महाराष्ट्रात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकासआघाडीतर्फे सत्ता स्थापनेसाठी जय्यत तयारी सुरू होती. उरण मतदारसंघातही त्या दृष्टीने विजयाचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत होते. मात्र, महाविकासआघाडीच्या सत्ता स्थापनेसाठी अंतिम काही तास शिल्लक असतानाच वेगवान घडामोडी घडल्या.4भाजप-राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा नाट्यमयरित्या शपथविधी झाल्यानंतर उरण मतदारसंघात भाजपने आमदार महेश बादली यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातून विजयी मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करून विजयी जल्लोष केला. या विजयी जल्लोषात तालुका, शहर अध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक सहभागी झाले होते.राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी स्थिर सरकार अस्तित्वात येणे आवश्यक होते. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यामुळे राज्यातील अस्थीरता आता संपणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम गतीने करता येईल.- मंदा म्हात्रे, आमदार बेलापूरसध्याच्या घडीला भाजपच राजकारण हे स्वार्थी राजकारण सुरु आहे. स्वत:च ध्येय साध्य करण्यासाठी काही पण करायला हि मंडळी तयार असल्याचे महाराष्ट्र आपल्या डोळ्यांनी पाहत आहे.मतदार केवळ मतदानापुरताच आहे कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- केसरीनाथ पाटील, चिटणीस,मनसे रायगड जिल्हासत्ता स्थापनेस नकार देणाºया भाजपचा खरा चेहरा आज जनतेसमोर आला आहे.भाजपचा हा डाव यशस्वी होणार नसून भाजपाला बहुमत साध्य करता येणार नाही.- सुदाम पाटील, तालुका प्रमुख, कॉग्रेसराजकारण्यांकडून लोकशाहीची चेष्ठा सुरु आहे. स्पष्ट बहुमत असताना सेना भाजपला सरकार स्थापन करता आले नाही .त्यानंतर सत्ता स्थापनेच घोड पुढे हाललच नाही.राज्यात ओला दुष्काळ असताना सत्तास्थापनेसाठी चाललेले स्वार्थी राजकारण दुर्दैवी आहे.- गणेश कडू , जिल्हा चिटणीस ,शेकाप

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारण