शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

संगणक शिक्षण होणार स्मार्ट

By admin | Published: February 02, 2016 2:10 AM

महापालिका शाळांतील घरघर लागलेल्या संगणक कक्षांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

नवी मुंबई : महापालिका शाळांतील घरघर लागलेल्या संगणक कक्षांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात रखडलेली निविदा प्रक्रियासुध्दा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या संगणक शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.महापालिकेच्या ६५ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने सात वर्षांपूर्वी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. या ठेक्याची मुदत २0१४ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर नवीन ठेकेदार नेमण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नाही. याचा परिणाम म्हणून तेव्हापासून शाळांतील संगणक कक्ष धूळखात पडून आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताचा हवाला देत नवी मुंबई विकास अधिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरी यांची भेट घेवून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार पटनिगीरी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना उपरोक्त आश्वासन दिले आहे. संगणक शिक्षण पूर्ववत करण्याच्या दृष्टीने १५ फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे मागील वर्षभरापासून संगणक कक्ष बंद पडले आहेत. तसेच अनेक केंद्रातील संगणक नादुरुस्त असल्याची बाब शिष्टमंडळातील सदस्यांनी पटनिगीरी यांच्या निदर्शनास आणून दिली. ही गंभीर बाब असून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रत्येक शाळेत जावून आतापर्यंत शिकविल्या गेलेल्या संगणकीय प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांकडून आढावा घेतला जाईल. त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही पटनिगीरी यांनी स्पष्ट केल्याचे डोके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)