शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

संगणक शिक्षण होणार स्मार्ट

By admin | Published: February 02, 2016 2:03 AM

महापालिका शाळांतील घरघर लागलेल्या संगणक कक्षांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

नवी मुंबई : महापालिका शाळांतील घरघर लागलेल्या संगणक कक्षांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात रखडलेली निविदा प्रक्रियासुध्दा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या संगणक शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.महापालिकेच्या ६५ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने सात वर्षांपूर्वी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. या ठेक्याची मुदत २0१४ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर नवीन ठेकेदार नेमण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नाही. याचा परिणाम म्हणून तेव्हापासून शाळांतील संगणक कक्ष धूळखात पडून आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताचा हवाला देत नवी मुंबई विकास अधिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरी यांची भेट घेवून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार पटनिगीरी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना उपरोक्त आश्वासन दिले आहे. संगणक शिक्षण पूर्ववत करण्याच्या दृष्टीने १५ फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या निविदेत संगणक शिक्षकांना किमान दहा हजार रुपये वेतन देण्याची तरतूद असल्याचे पटनिगीरी यांनी स्पष्ट केल्याचे संस्थेचे अध्यक्ष संकेत डोके यांनी सांगितले. ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे मागील वर्षभरापासून संगणक कक्ष बंद पडले आहेत. (प्रतिनिधी)