शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:14 AM2019-06-07T01:14:03+5:302019-06-07T01:14:19+5:30
आयुक्तांनी केली पाहणी : कामाचा दर्जा राखण्याचे दिले निर्देश
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील नागरिकांना खड्डेविरहित चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी अल्ट्राथीन व्हाइट टॅपिंग काँक्र ीट रस्ते बनविण्यात येत आहेत. शिरवणे व कोपरी गाव येथे प्रायोगिक स्वरूपात हे रस्ते बनविण्यात येत असून, पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी गुरु वार, ६ जून रोजी कामांची पाहणी करीत कामाचा योग्य दर्जा राखण्याचे निर्देश दिले.
शहरातील अंतर्गत रस्ते वारंवार खराब होत आहेत, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचे आयुर्मान १० ते १५ वर्षे वाढविण्यासाठी अल्ट्राथीन व्हाइट टॅपिंग काँक्र ीटने रस्त्याची सुधारणा करण्यात येत आहे. यामुळे वारंवार रस्ते खराब झाल्याने दुरु स्ती करण्याची गरज भासणार नाही. तसेच रस्ते बनविण्याचा खर्चही तुलनेत कमी असून यामुळे खर्चात व वेळेत बचत होणार आहे. शिरवणे व कोपरी गावात प्रायोगिक तत्त्वावर बनविण्यात येणाऱ्या रस्त्यांप्रमाणेच इतरही गाव-गावठाण व गावठाण विस्तार भागात अल्ट्राथीन व्हाइट टॅपिंग काँक्रीट रस्ते बनविण्यात येणार आहेत. यामधून रस्त्यांची गुणवत्ता वाढणार आहे.
शिरवणे मार्केट परिसरात प्रायोगिक स्वरूपात बनविण्यात येत असलेल्या कामाची पाहणी करताना हे काम विहित वेळेत व कामाचा दर्जा राखून पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. नेरु ळ सेक्टर १ शिरवणे मार्केट समोरील व्हाइट टॅपिंग काँक्रीट रस्ते कामाची आयुक्तांनी पाहणी केली, या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे व इतर अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.