नवी मुंबईत रोटरीची परिषद; मान्यवर, तज्ज्ञांची उपस्थिती; वार्षिक कॉन्फरन्स ३,४ फेब्रुवारीला
By नारायण जाधव | Published: January 31, 2024 04:45 PM2024-01-31T16:45:25+5:302024-01-31T16:48:20+5:30
शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते वार्षिक कॉन्फरन्सचे होणार उद्घाटन
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी-शहापूर आदी भागांतील रोटरी क्लबची वार्षिक कॉन्फरन्स ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून पुढील दोन दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवर या परिषदेत विचार मांडणार आहेत.
माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, अध्यात्मिक गुरु डॉ. स्वरुपानंद सरस्वती, राम मंदिर निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे टाटाचे प्रकल्प प्रमुख निलेश ताम्हाणे,परमविरचक्र विजेते आणि कारगिल युध्दात लक्षणीय कामगिरी बजावणारे कॅ. योगेंद्र यादव, मेट्रो वुमन अश्विनी भिडे, आदित्य मोहीमेतील प्रमुख शास्त्रज्ञ निगर शाजी, वंदे भारतचे सुधांशू मणी, क्रिकेटपटू करसन घावरी, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. उदय निरगुडकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील, जेनेरिक औषधांच्या प्रसार आणि प्रचाराचे लक्षणीय काम करणारे अर्जुन देशपांडे,अंबा युध्द नौकेवरील पहिल्या महिला कमांडर इंदू प्रभा, जम्मू-काश्मिरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन, अभिनेते मुनी झा, वास्तूशास्त्र तज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव, पर्यावरणतज्ज्ञ श्री. संतोष गोंधळेकर, आर्थिक सुरक्षातज्ज्ञ डॉ. अपूर्वा जोशी, चाणक्य नीतीवर बोलणारे डॉ. राधाकृष्ण पिल्ले, निवृत्त एअर चिफ मार्शल बिरेंद्रसिंग धनुआ आदी मान्यवर या परिषदेत विचार मांडणार आहेत, अशी माहिती रोटरी-3142चे प्रांतपाल मिलिन्द कुलकर्णी यांनी दिली.