पनवेलमधील डबल मर्डर प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, जमिनीच्या वादातून हत्या केल्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:56 PM2017-10-12T12:56:05+5:302017-10-12T12:56:32+5:30
पनवेलमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणात दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पनवेल- पनवेलमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणात दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सतीश खुटले व राजन उदरे अशी आरोपीचीं नावं आहेत. जमिनीच्या वादातून दोन महिलांची हत्या केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे.
पनवेलमध्ये तलवारीनं वार करुन दोन महिलांची निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. अज्ञातांनी घरात घुसून सासू-सुनची हत्या केली होती. हत्या करण्यामागील कारण स्पष्ट झालं नव्हतं. पण आता पोलीस तपासातून हत्ये मागील कारण समोर आलं आहे. जमिनीच्या वादातून सासू-सुनेची हत्या केल्याची कबुली दोघा आरोपींनी दिली आहे. पनवेलमधील नांदगाव येथील हा धक्कादायक प्रकार आहे. मंगळवारी(10 ऑक्टोबर) दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हत्येबाबतची माहिती समोर आली. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले होते.