- अनंत पाटील नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांची दिवसेंदिवस दुरवस्था होऊ लागली आहे. जागोजागी निखळलेले प्लॅस्टर, गळणारे छप्पर, खराब झालेले अग्निशमन यंत्रणेचे बॉक्स, पाण्याची टंचाई, तुटलेल्या टाईल्स, अर्धवट संरक्षण भिंतीची समस्या यामुळे अक्षरश: दुर्दशा झाली आहे. दररोज येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.ठाणे-वाशी-पनवेल रेल्वे मार्गावर मोठा गाजावाजा करत १२ डब्यांची लोकल सुरू करणाºया रेल्वे प्रशासनाने स्थानकांमध्ये सिडकोने सोयी-सुविधा दिल्या. मात्र स्थानकाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्याने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकात समस्यांचे प्रमाण वाढले आहे. बेलापूर, नेरु ळ, जुईनगर,सीवूड, वाशी, सानपाडा अशा स्थानकांची पुरेशा देखभालीअभावी अक्षरश: दुरवस्था झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या तुलनेत सिडकोने नवी मुंबईत अतिशय भव्य अशी रेल्वे स्थानके उभारली आहेत. या रेल्वे स्थानकांच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेने स्वीकारावी, अशी सिडकोची अपेक्षा आहे. मात्र, देखभाल, दुरुस्तीच्या कामावरून सिडको आणि रेल्वे प्रशासनात मतभेद आहेत. या मतभेदांमुळे रेल्वे स्थानकांना अक्षरश: गळती लागली आहे. सिडको आणि रेल्वेने मतभेद मिटवून रेल्वे स्थानकांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे स्थानकाबाहेर मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आलेले आहे, रेल्वेच्या अर्धवट संरक्षण भिंतीमुळे रेल्वे लाइन ओलांडताना अपघाताची शक्यता टाळता येत नाही. तसेच शॉर्टकटचा मार्ग काढून विनातिकीट प्रवास करणाºया फुकट्या प्रवाशांची चांदी होते.वाशी रेल्वे स्थानकातील अग्निशमन यंत्रणा बॉक्स रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून गंजून सडलेल्या अवस्थेत आहे. त्याकडे रेल्वे आणि सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.>वाशी रेल्वे स्थानक परिसरात सिडकोच्या वतीने रेल्वेच्या प्रवाशांसाठी सेवा सुविधा पुरविलेल्या आहेत. काही ठिकाणी अग्निशमन यंत्रणेचे बॉक्स खराब झालेले आहेत, तर पिण्याचे पाणी आम्ही नियमित चालू ठेवतो, मात्र काही टवाळखोर आणि माथेफिरू तसेच भिकाºयांकडून अनेकदा नळ चोरीला जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. आता असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाईल.- सुदर्शन खुराना, स्टेशन व्यवस्थापक, वाशी रेल्वे स्टेशन
रेल्वे स्टेशन परिसराला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:34 AM