दिवा रोहा गाडी पकडताना प्रवाशांचा गोंधळ, पनवेल स्थानकात नॉन प्लॅटफॉर्म वर गाडी थांबल्याने घडली घटना 

By वैभव गायकर | Published: October 8, 2022 03:56 PM2022-10-08T15:56:34+5:302022-10-08T15:58:14+5:30

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर थांबणे अपेक्षित होते.मात्र ही गाडी प्लॅटफॉर्म वर थांबलीच नाही. अचानकपणे हा प्रकार घडल्याने या रेल्वेत जाणाऱ्या प्रवाशांनी गाडी पकडण्याचा नांदत ट्रॅक ओलांडला. नॉन प्लॅटफॉर्म वर गाडी थांबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

Confusion of passengers while catching the Diva Roha train, the incident happened when the train stopped on a non-platform in Panvel station | दिवा रोहा गाडी पकडताना प्रवाशांचा गोंधळ, पनवेल स्थानकात नॉन प्लॅटफॉर्म वर गाडी थांबल्याने घडली घटना 

दिवा रोहा गाडी पकडताना प्रवाशांचा गोंधळ, पनवेल स्थानकात नॉन प्लॅटफॉर्म वर गाडी थांबल्याने घडली घटना 

Next


पनवेल : रोहा दिवा गाडी पकडताना पनवेल रेल्वे स्थानकात शनिवारी (दि.8) सकाळी 9.29 च्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. पनवेल स्थानकात आलेली गाडी नेमलेल्या प्लॅटफॉर्मवर न थांबता नॉन फ्लॅटफॉर्मवर थांबल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. अचानकपणे हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक ओलांडून गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ट्रॅकवरून दुसरी गाडी येत नसल्याने हा प्रकार घडला.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर थांबणे अपेक्षित होते.मात्र ही गाडी प्लॅटफॉर्म वर थांबलीच नाही. अचानकपणे हा प्रकार घडल्याने या रेल्वेत जाणाऱ्या प्रवाशांनी गाडी पकडण्याचा नांदत ट्रॅक ओलांडला. नॉन प्लॅटफॉर्म वर गाडी थांबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दहा ते पंधरा मिनिटे हा गोंधळ पनवेल रेल्वे स्थानकात सुरु होता. सकाळची वेळ असल्याने पनवेल सारख्या स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ याठिकाणी असते. त्यामुळे या घटनेमुळे अपघातांवर निमंत्रण मिळाले होते. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे रेल्वेचे वेळापत्रक असल्याने पनवेल स्थानकातून  लोकलच नव्हे तर लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील येजा करत असतात. अशावेळेला या घटनेमुळे निर्माण झालेल्या गोंधळाला जबाबदार कोण आहे? याबाबत चौकशीची गरज आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सुदैवाने या घटनेत कोणता अपघात झाला नसला तरी रेल्वे कंट्रोल रूमची प्रथमदर्शनी चुकी यामध्ये दिसते. अशाप्रकारे घटना घडतेच कशी? असा प्रश्न यावेळी केंद्र सरकारच्या मध्य रेल्वे समितीचे सल्लागार अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे.

ही घटना कोणाच्या चुकीमुळे घडली याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नेमलेल्या प्लॅटफॉर्म ऐवजी नॉन प्लॅटफॉर्म वर गाडी थांबल्याने ही घटना घडली. घटनेच्या चौकशीमधील रिपोर्टनंतर या घटनेचे खरे कारण समोर येईल.
-जे पी मीना (स्थानक प्रबंधक ,पनवेल रेल्वे स्थानक)

Web Title: Confusion of passengers while catching the Diva Roha train, the incident happened when the train stopped on a non-platform in Panvel station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.