पनवेल: एकिकडे राज्यभरात आज ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत असताना पनवेलमध्येशाळा सुरु कारण्यावरुन गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनातील सुसंवाद ,शाळा सुरु करण्यासाठीची पूर्वतयारी, लसीकरण आदींसह विविध कारणामुळे पनवेल तालुक्यातील शाळा सुरु करण्याबाबत बहुतांशी शाळाचा गोंधळ निर्माण झालेला आहे.
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा शासन निर्णयानुसार सुरु होत आहेत. पनवेल मध्ये खाजगी ,सरकारी अशा एकूण १३० शाळा आहेत.मात्र शिक्षकांचा उडालेला गोंधळ ,लसीकरण ,आरटीपीसीआर चाचणी आदींमुळे देखील आज सोमवारी शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत.दरम्यान पनवेलचे गटशिक्षण अधिकारी महेश खामकर यांनी शाळा सुरु करण्याच्या सूचना शाळा प्रशासनाला दिल्या असल्याचे सांगितले.याकरिता आमचे केंद्र प्रमुख शाळा सुरु होण्याबाबत माहिती घेत असल्याचे ते म्हणाले.पालिकेच्या मालकीच्या १० शाळा ७ वी पर्यतच असल्याने त्या शाळा बंदच राहतील अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी दिली.