वाशी स्थानकात काँगे्रसची निदर्शने
By admin | Published: August 26, 2015 10:40 PM2015-08-26T22:40:22+5:302015-08-26T22:40:22+5:30
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन
नवी मुंबई : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन सुरू केले आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर निदर्शने करून सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला आहे.
वाशी रेल्वे स्टेशनसमोर काँगे्रस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. माजी मंत्री नसीम खान यांनी सरकारवर टीका केली. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यात सरकारचे विविध घोटाळे समोर येत आहेत. अच्छे दिन आऐंगे, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु प्रत्यक्षात जनतेची दिशाभूल झाली आहे. महागाईमुळे जगणे अशक्य झाल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, उपमहापौर अविनाश लाड यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली. कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे चांगले पैसे येत नाहीत व ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळत नसल्याची टीकाही यावेळी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा नीला लिमये, रमाकांत म्हात्रे, अनिल कौशिक, संतोष शेट्टी, सुधीर पवार, अंजली वाळुंज, वैजयंती भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.