'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 03:33 PM2022-08-31T15:33:33+5:302022-08-31T15:35:01+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.

Congress leader Balasaheb Thorat has criticized MNS chief Raj Thackeray. | 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

Next

नवी मुंबई- भाजपा नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व आले आहे. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. या भेटीमागचे कारण कळू शकले नाही. मात्र, या भेटींमुळे भाजपा-मनसे युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

विशेषतः मुंबई महापालिकेत मनसेबरोबर यावी, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा असल्याचे समजते. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. बाळासाहेब थोरात आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राज ठाकरे यांची वाटचाल कशी चाललेली आहे हे आपण पहिल्यापासून पाहत आले आहोत. 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे राज ठाकरे खरे राज ठाकरे होते. मात्र आता ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. 

दरम्यान, राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या दीड महिन्यात राज आणि आगामी फडणवीस यांची ही दुसरी भेट आहे. मागील महिन्यात फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सोमवारीच भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

मनसेची आक्रमक हिंदुत्व भूमिका

गेल्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारल्याचं दिसून येत आहे. अलीकडेच भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या भूमिकेवरून देशासह जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपानं पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर अलीकडेच राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांची थेट पाठराखण केली. जे इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक बोलतो तेच नुपूर शर्मा बोलल्या. त्यात चुकलं कुठे? असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. 

Web Title: Congress leader Balasaheb Thorat has criticized MNS chief Raj Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.