वाशीत सिडकोविरोधात काँगे्रसची निदर्शने

By admin | Published: August 28, 2015 11:34 PM2015-08-28T23:34:55+5:302015-08-28T23:34:55+5:30

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोने वाशीमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. सिडकोने यापूर्वी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे

Congressional demonstrations against Vaishit CIDCO | वाशीत सिडकोविरोधात काँगे्रसची निदर्शने

वाशीत सिडकोविरोधात काँगे्रसची निदर्शने

Next

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्पग्रस्तांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोने वाशीमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. सिडकोने यापूर्वी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे. अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले नसल्यामुळे काँगे्रसने निदर्शने करून आम्ही फसलो, तुम्ही फसू नका, असे आवाहन विमानतळबाधितांना केले.
नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रकल्पबाधितांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोने वाशीमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती देण्यात येत होती. परंतु सिडकोचा यापूर्वीचा अनुभव वाईट असल्यामुळे काँगे्रस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. नवी मुंबई वसविण्यासाठी सिडकोने ९५ गावांमधील प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित केली. ४० वर्षांनंतरही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे सोडविले नाहीत. साडेबारा टक्के योजना पूर्ण केली नाही. गावठाणांचा विकास केला नाही. गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. सिडको आम्ही शहर उभारले असे घोषवाक्य मिरवते. परंतु आता विमानतळबाधितांनी सावध राहावे. सिडकोवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. वुई मेक सिटी नाही तर आता वुई डेव्हलप व्हिलेज ही संकल्पना पहिले राबवा अशी मागणी केली. आम्ही फसलो, आता विमानतळ व नैना क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांनो तुम्ही फसू नका, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सिडको प्रदर्शनी केंद्राबाहेर फलक दाखवून निदर्शने केली. यावेळी दशरथ भगत, निशांत भगत, शैलेश घाग व इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवाजी चौकातही निदर्शने
काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी एफटीआयआयचे डायरेक्टर गजेंद्र चौहान यांची पात्रता नसतानाही पदावर बसविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतरही त्यांना पदावरून हटविले जात नाही. भाजपा सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा निषेध करण्यासाठी काँगे्रसने वाशी शिवाजी चौकात निदर्शने केली. यावेळी ओमकार कोल्हे, अर्चना कुंभार, सागर जगताप, सुशांत लंबे, ओवेस शीख, निशा धोत्रे, आकाश घाडगे व इतर उपस्थित होते.

Web Title: Congressional demonstrations against Vaishit CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.