शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

वाशीत सिडकोविरोधात काँगे्रसची निदर्शने

By admin | Published: August 28, 2015 11:34 PM

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोने वाशीमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. सिडकोने यापूर्वी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्पग्रस्तांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोने वाशीमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. सिडकोने यापूर्वी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे. अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले नसल्यामुळे काँगे्रसने निदर्शने करून आम्ही फसलो, तुम्ही फसू नका, असे आवाहन विमानतळबाधितांना केले. नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रकल्पबाधितांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोने वाशीमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती देण्यात येत होती. परंतु सिडकोचा यापूर्वीचा अनुभव वाईट असल्यामुळे काँगे्रस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. नवी मुंबई वसविण्यासाठी सिडकोने ९५ गावांमधील प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित केली. ४० वर्षांनंतरही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे सोडविले नाहीत. साडेबारा टक्के योजना पूर्ण केली नाही. गावठाणांचा विकास केला नाही. गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. सिडको आम्ही शहर उभारले असे घोषवाक्य मिरवते. परंतु आता विमानतळबाधितांनी सावध राहावे. सिडकोवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. वुई मेक सिटी नाही तर आता वुई डेव्हलप व्हिलेज ही संकल्पना पहिले राबवा अशी मागणी केली. आम्ही फसलो, आता विमानतळ व नैना क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांनो तुम्ही फसू नका, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सिडको प्रदर्शनी केंद्राबाहेर फलक दाखवून निदर्शने केली. यावेळी दशरथ भगत, निशांत भगत, शैलेश घाग व इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजी चौकातही निदर्शनेकाँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी एफटीआयआयचे डायरेक्टर गजेंद्र चौहान यांची पात्रता नसतानाही पदावर बसविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतरही त्यांना पदावरून हटविले जात नाही. भाजपा सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा निषेध करण्यासाठी काँगे्रसने वाशी शिवाजी चौकात निदर्शने केली. यावेळी ओमकार कोल्हे, अर्चना कुंभार, सागर जगताप, सुशांत लंबे, ओवेस शीख, निशा धोत्रे, आकाश घाडगे व इतर उपस्थित होते.