CoronaVirus News in Navi Mumbai: कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांना दिलासा, दररोज अहवाल देण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:10 AM2020-05-02T01:10:50+5:302020-05-02T01:11:05+5:30

रुग्णालयात उपचारासाठी किती बेड उपलब्ध आहेत, याचा प्रत्येक दिवशी अहवाल देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

Consolation to patients in addition to corona, daily reporting instructions | CoronaVirus News in Navi Mumbai: कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांना दिलासा, दररोज अहवाल देण्याच्या सूचना

CoronaVirus News in Navi Mumbai: कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांना दिलासा, दररोज अहवाल देण्याच्या सूचना

Next

नवी मुंबई : शहरातील एकही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये, कोरोनाव्यतिरिक्त आजारांवरही योग्य व वेळेत उपचार झाले पाहिजेत, असे निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व रुग्णालयांना दिले आहेत. रुग्णालयात उपचारासाठी किती बेड उपलब्ध आहेत, याचा प्रत्येक दिवशी अहवाल देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविड विशेष रुग्णालयात रूपांतर केले आहे. फ्ल्यू क्लिनिक, कोविड हेल्थ सेंटर, केअर सेंटरही सुरू केली आहेत.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर अनेक खासगी रुग्णालये व क्लिनिक बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे कोविडव्यतिरिक्त आजारांवर उपचार कुठे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन, खासगी रुग्णालये सुरू ठेवावी व तेथे कोरोनाव्यतिरिक्त आजारांवर उपचार केले जावे, अशा सूचना महापालिकेने सर्व रुग्णालय व्यवस्थापनांना केल्या आहेत. त्यानुसार जवळपास २० मोठ्या रुग्णालयांसह १०० छोटी-मोठी रुग्णालये सुरू केली आहेत.
पालिका आयुक्त मिसाळ यांनी सर्व रुग्णालयांचा नियमित आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयांनी उपलब्ध बेडची माहिती रोज पालिकेला देणे बंधनकारक आहे. यामुळे मनपाला कोणत्या रुग्णालयात किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत, कुठे किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती मिळणार आहे. खासगी रुग्णालयांनी कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
>अन्य आजारांवर उपचार करणारी रुग्णालये
मनपाचे राजमाता जिजाऊ रुग्णालय (सेक्टर ३, ऐरोली), मनपाचे माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय (सेक्टर १५, नेरूळ), महानगरपालिका माता बाल रूग्णालय (बेलापूर गाव), मनपा संलग्नित डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय (सेक्टर ७, नेरूळ), एम.जी.एम. (सेक्टर ३, वाशी), अपोलो (सेक्टर २३, सी.बी.डी. बेलापूर),
तेरणा (सेक्टर २२, नेरूळ), रिलायन्स रुग्णालय (एम.आय.डी.सी., कोपरखैरणे), साई स्नेहदीप रुग्णालय (सेक्टर २०, कोपरखैरणे), एम.पी.सी.टी. रुग्णालय (सेक्टर ४, सानपाडा),
मंगल प्रभू नर्सिंग होम (सेक्टर २४, जुईनगर, नेरूळ), माथाडी रुग्णालय (सेक्टर ३, कोपरखैरणे), न्युरोजेन बी.एस.आय. स्टेन एशिया रुग्णालय (सेक्टर ४०, नेरूळ), इंद्रावती रुग्णालय (सेक्टर ३, ऐरोली), पी.के.सी. रुग्णालय (सेक्टर १५ ए, वाशी),
कमलेश मदर अँड चाइल्ड रुग्णालय (सेक्टर ८, नेरूळ), सुरज रुग्णालय (सेक्टर १५, सानपाडा), लायन्स सर्व्हिस सेंटर (सेक्टर ७, कोपरखैरणे), एम.जी.एम. (सेक्टर १ ए, सी.बी.डी. बेलापूर),
शुश्रूषा हार्ट केअर सेंटर (सेक्टर ६, नेरुळ), ग्लोबल ५ हेल्थ केअर (सेक्टर ९, वाशी), आचार्य श्री नानेश रुग्णालय (सेक्टर ८ ए, सी.बी.डी. बेलापूर), न्यू मिलेनिअम मल्टीस्पेशालिटी रुग्णालय (सेक्टर ५, सानपाडा), डिव्हाइन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
(से. ६, घणसोली)
>नवी मुंबईमध्ये दोन कोविड केअर सेंटर
शहरात दोन कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. प्रत्येक सेंटरमध्ये २ स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. एका कक्षात स्वॅब सॅम्पल टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या व सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविड १९ बाधितांवर उपचार केले जातात, तर दुसऱ्या कक्षात कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाइन नागरिकांना ठेवले जाते. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कोरोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळणाºया कोविडबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता चार डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर स्थापित करण्यात आले आहेत. हिरानंदानी फोर्टिस, वाशी (४६ खाटा), डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ (१०० खाटा), रिलायन्स रुग्णालय, कोपरखैरणे (५० खाटा)
>डेडिकेटेड कोविड रुग्णालय
कोरोनाची गंभीर स्वरूपातील लक्षणे असलेल्या कोविडबाधित रुग्णांवर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात (डेडिकेटेड कोविड रुग्णालय) उपचार केले जात असून तेथे १२० बेड उपलब्ध केले आहेत.
>मनपाने केलेली उपाययोजना
फ्ल्यू क्लिनिक- मनपा क्षेत्रात २७ फ्ल्यू क्लिनिक सुरू आहेत. या ठिकाणी ताप, सर्दी, घशात खवखव, श्वासोच्छ्वासास त्रास अशी लक्षणे असणाºया नागरिकांवर उपचार केले जातात व कोविडसदृश लक्षणे असल्यास स्वॅब टेस्टिंग करता येणार आहे. महानगरपालिका योग्य उपाययोजना करत आहे.

Web Title: Consolation to patients in addition to corona, daily reporting instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.