नामदेव मोरेनवी मुंबई : फोर्टीज हिरानंदानी रुग्णालयामध्ये पालिकेच्या कोट्यातून प्रत्येक वर्षी ८०० मोफत सुपरस्पेशालिटी शस्त्रक्रिया केल्या जातात; परंतु या योजनेचा लाभ शहरातील गरीब रुग्णांना घेऊ दिला जात नाही. राजकीय व आर्थिक वशिला असणाºयांनाच पालिकेच्या कोट्यातून हिरानंदानीमध्ये उपचारासाठी पाठविले जात आहे. एप्रिल २०१५पासून या योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांच्या आर्थिक स्थितीची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कोपरखैरणेमध्ये राहणाºया रिक्षा चालकाच्या पत्नीला शनिवारी अर्धांगवायूचा झटका आला. महिलेला उपचारासाठी महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णास आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज आहे. हृदयविकार तज्ज्ञाकडून त्यांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पालिका रुग्णालयामध्ये आयसीयू युनिटमध्ये जागा नाही व हृदयविकारतज्ज्ञही नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णाच्या नातेवाइकाने पालिकेच्या कोट्यातील हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयामध्ये पालिकेच्या कोट्यातून संदर्भीत करण्याची विनंती केली; परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तुमचे दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्ड असेल तरच तिथे पाठविता येते, असे सांगितले. ज्या डॉक्टरांकडे जबाबदारी आहे ते येथे नसून उद्या या असे सांगून रुग्णास मुंबईमध्ये किंवा इतर रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यास सांगितले. नाइलाजाने या रुग्णाला मुंबईत घेऊन जावे लागले. या घटनेमुळे सुपरस्पेशालिटी उपचारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गरीब रुग्णांवर मोफत उपचार करता यावेत, यासाठी पालिकेने २००६मध्ये प्रथम संदर्भ रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा हिरानंदानी रुग्णालयास ३ रुपये ७५ पैसे दराने उपलब्ध करून देण्यात आली. हिरानंदानीने हे रुग्णालय फोर्टीजला विकले व तेथे २००८मध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले. पालिकेच्या रुग्णांसाठी १५ बेड राखीव ठेवण्यात आले होते. पालिकेचे रुग्ण संदर्भीत करण्याचे धोरण ठरले नसल्याने तीन वर्षे एकही रुग्णास फायदा झाला नाही. २०११मध्ये रुग्ण संदर्भीत करण्याचे धोरण ठरले; पण त्याचाही लाभ होत नसल्याने एप्रिल २०१५मध्ये ८०० मोफत शस्त्रक्रिया करण्याचे सुधारीत धोरण ठरविले आहे.मोफत शस्त्रक्रियेचे धोरण निश्चित होऊन अडीच वर्षे झाली; परंतु या कालावधीमध्ये अद्याप एकही गरीब रुग्णावर उपचार होऊ शकलेले नाहीत. आमदार, राजकीय वजन असलेले नगरसेवकांचा वशिला असलेल्या रुग्णांनाच पालिकेच्या कोट्यातून हिरानंदानीमध्ये पाठविण्यात येत आहे. याशिवाय आर्थिक स्थिती चांगली असणाºयांना वशिल्याने गरिबांसाठीच्या राखीव कोट्यातून उपचार मिळवून दिले जात आहेत. गरीब रुग्णांना या योजनेची माहितीच दिली जात नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनी विचारणा केली तर त्यांना उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड दाखवा, असे सांगून हिरानंदानीमध्ये पाठविण्याचे टाळले जात आहे. रुग्ण संदर्भीत करण्यामध्ये मोठा घोटाळा सुरू असून चौकशीची मागणी केली आहे.>लाभार्थींच्या कागदपत्रांची तपासणी व्हावीमहापालिकेच्या कोट्यातून मोफत शस्त्रक्रिया योजनेचा लाभ घेतलेल्या रूग्णांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची गरज आहे. रूग्णांसाठी कोणी वशिला लावला होता. कोणत्या राजकीय नेत्यांनी रूग्णासाठी शिफारस केली, याची चौकशी होणे आवश्यक आहे. झोपडपट्टी परिसरातील किती गरिबांवर मोफत उपचार केले याची माहिती सर्वांसमोर येणे आवश्यक असून सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी माहिती अधिकारातून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.>मदत करणारी यंत्रणाच नाहीशनिवारी कोपरखैरणेमधील महिलेला अर्धांगवायूचा झटका आल्याने तिच्या नातेवाइकांनी हिरानंदानी फोर्टीज रूग्णालयात संदर्भीत करावे, अशी विनंती केली होती; परंतु नातेवाइकांना दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्डची मागणी करण्यात आली. डॉक्टरांनी काहीही माहिती दिली नाही. यामुळे रूग्णालयामध्ये गरिबांना मदत करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून याची चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.>महासभाही अंधारातपालिकेने ८०० रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय एप्रिल २०१५मध्ये घेतला आहे. एक वर्ष प्रायोगिक तत्त्वावर या योजनेला मंजुरी दिली होती. एप्रिल २०१६मध्ये हा विषय पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे येणे आवश्यक होते; परंतु अडीच वर्षांनंतरही अद्याप तो पुन्हा मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे आलाच नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.>सुपरस्पेशालिटी रूग्णालयाचे दहा वर्षांतील महत्त्वाचे टप्पे२००६मध्ये पालिकेने हिरानंदानीला २० हजार चौरस फूट जागा देण्याचा करार केलागरीब रुग्णांवर मोफत उपचारासाठी प्रति चौरस मीटरसाठी फक्त ३ रुपये ७४ पैसे भाडे आकारलेपालिकेच्या रुग्णांसाठी १० टक्के बेड राखीव ठेवण्याचा निर्णय२००७ मध्ये हिरानंदानीने सर्व शेअर फोर्टीजला विकले२००७मध्ये स्थायी समितीमध्ये तत्कालीन सभापती विजय चौगुले यांनी करार रद्द करण्याची मागणी केली.२००८मध्ये हिरानंदानी फार्टीज रुग्णालय सुरू२००८ ते २०१० पालिकेचे रुग्ण पाठविण्याचे धोरण ठरले नाही२०११- रुग्ण पाठविण्यास सुरुवात पण गरीब रुग्णांना उपचार परवडेनात२०१५ - ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा ठराव मंजूरउत्पन्नाचे खोटे दाखलेपालिकेच्या योजनेतून मोफत उपचार मिळविण्यासाठी उत्पन्नाचे खोटे दाखले सादर केले जात आहेत.यापूर्वी नेरूळमधील एक रूग्णाने उत्पन्नाचा खोटा दाखला दाखवून उपचार घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रूग्णाविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोफत उपचारांची वशिलेबाजांवर खैरात, गरीब रूग्णांना उपचारापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:34 AM