बेचव विदेशी कांद्याकडे ग्राहकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 03:49 AM2019-12-26T03:49:40+5:302019-12-26T03:50:13+5:30
विदेशी कांद्याचा आकार महाराष्ट्रातील कांद्यापेक्षा खूपच मोठा आहे. काहींचा आकार पाव
नवी मुंबई : कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यापासून मुंबईमध्ये नियमितपणे इजिप्त व तुर्कीवरून कांद्याची आयात केली जात आहे. आयात कांदा तिखट नसल्यामुळे त्याचा घरगुती वापरासाठी वापर होत नाही. विदेशी कांदा आकारानेही मोठा असून काहींचे वजन पाव ते अर्धा किलो असल्यामुळे त्याचा वापर हॉटेलसाठी केला जात आहे.
देशात सर्वत्रच कांद्याची टंचाई सुरू आहे. मुंबईमध्येही मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे दरांमध्ये वारंवार चढ-उतार होत आहे. सद्यस्थितीमध्ये ६०० ते एक हजार टन कांद्याची नियमित आवक होत आहे. जवळपास एक महिन्यापासून सातत्याने विदेशातूनही कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. इजिप्त व तुर्कीचा कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. विदेशी कांद्याला ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर प्राप्त होत आहे.
विदेशी कांद्याचा आकार महाराष्ट्रातील कांद्यापेक्षा खूपच मोठा आहे. काहींचा आकार पाव ते अर्धा किलो आहे. एवढ्या मोठ्या आकाराच्या कांद्याचा घरगुती वापर होऊ शकत नाही. याशिवाय तो तिखटही नसल्याने गृहिणींकडून खरेदी केला जात नाही.