मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, 3oo टन भाजीपाला भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:14 AM2023-07-20T11:14:23+5:302023-07-20T11:14:47+5:30

मुसळधार पावसाचा फटका : मागणी घटल्यामुळे भाव घसरले

Consumers back due to heavy rains, 3oo tonnes of vegetables ground | मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, 3oo टन भाजीपाला भुईसपाट

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, 3oo टन भाजीपाला भुईसपाट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्याच्या विक्रीवरही झाला आहे. मुंबई बाजार समितीत  ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे जवळपास जवळपास ३०० टन माल शिल्लक आहे. मागणी घटल्यामुळे अनेक भाज्यांचे दरही घसरले आहेत.

मुंबई, नवी मुंबईमध्येही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पदपथावर व्यवसाय करणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी बुधवारी भाजीपाला खरेदी केला नाही. बाजार समितीमध्ये मध्यरात्रीपासून ५३५ वाहनांमधून २,२२१ टन भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये चार लाख ९८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक भाज्यांच्या दरामध्ये या आठवड्यात घसरण सुरू झाली आहे.

तेजी आणि घसरण...
फ्लॉवर २५ ते ३५ वरून १६ ते २० वर आला आहे. कोबी १५ ते २० वरून १० ते १४, शेवगा ४० ते ५० वरून ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. कोथिंबीर १६ ते २२ वरून ८ ते १२, मेथी १५ ते २० वरून १० ते १४, पालक ८ ते १२ वरून ६ ते १०, शेपू १४ ते १८ वरून १० ते १६ रुपये जुडी झाली आहे.  

बाजार समितीमधील भाजीपाल्यांचे प्रतीकिलो दर

भाजी     १२ जुलै     १९ जुलै 
दुधी भोपळा     २२ ते २८     २० ते २६
फ्लॉवर     २५ ते ३५     १६ ते २०
कारली     ४० ते ५०    ३५ ते ४२
कोबी     १५ ते २०    १० ते १४
शेवगा शेंग     ४० ते ५०     ३० ते ४०
कांदापात     ४० ते ४८     ३५ ते ४२
कोथिंबीर जुडी     १६ ते २२     ८ ते १२
मेथी     १५ ते २०    १० ते १४
पालक     ८ ते १२    ६ ते १०
पुदिना     ३ ते १०    ३ ते ४
शेपू     १४ ते १८     १० ते १६

पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी होती. मागणी नसल्यामुळे भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात घसरले  आहेत. 
- शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट

Web Title: Consumers back due to heavy rains, 3oo tonnes of vegetables ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.