महागाईमुळे फळ मार्केटकडे ग्राहकांची पाठ; गणेशोत्सव काळातही पुरेशी आवक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 11:56 PM2020-08-25T23:56:57+5:302020-08-26T06:44:52+5:30

सफरचंद २०० रुपये किलो, किरकोळ मार्केटमध्ये परिस्थितीमध्ये चिकू १०० रुपये किलो, डाळिंब ८०, पपई ४०, पेरू १००, संत्री २०० व सीताफळ ८० रुपये किलो दराने विकले जात आहे.

Consumers turn to fruit market due to inflation; There is not enough income even during Ganeshotsav | महागाईमुळे फळ मार्केटकडे ग्राहकांची पाठ; गणेशोत्सव काळातही पुरेशी आवक नाही

महागाईमुळे फळ मार्केटकडे ग्राहकांची पाठ; गणेशोत्सव काळातही पुरेशी आवक नाही

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : गणेशोत्सव काळात सफरचंदाची आवक घसरली असून, बाजारभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये सफरचंद १४० ते २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर फळांचे दरही वाढले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उत्सव काळातही फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात प्रतिदिन जवळपास दीड ते दोन हजार टन फळांची आवक होत असते, परंतु या वर्षी जेमतेम एक हजार टन फळांचीच आवक होत आहे. गतवर्षी उत्सव काळात हिमाचल प्रदेश व काश्मीरमधून ५० ते ६० ट्रक सफरचंदाची आवक होत होती. या वर्षी फक्त १५ ते २० ट्रक येत आहेत. सोमवारी ३३२ टन सफरचंदाची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये सफरचंद ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १४० ते २०० रुपयांवर गेले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सफरचंदाऐवजी इतर फळांना पसंती दिली आहे.

किरकोळ मार्केटमध्ये परिस्थितीमध्ये चिकू १०० रुपये किलो, डाळिंब ८०, पपई ४०, पेरू १००, संत्री २०० व सीताफळ ८० रुपये किलो दराने विकले जात आहे. मोसंबी १२० रुपये डझन दराने विकली जात आहे. उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेल्या परिसरात हे दर यापेक्षाही जास्त आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नाही. अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. दैनंदिन गरजा भागविणेही अवघड झाले आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे. एपीएमसीमध्ये ही ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. या वर्षी सफरचंदाचे उत्पादनही कमी झाले असून, त्याचा दर्जाही हलका आहे, परंतु यानंतरही भाव वाढल्याने सामान्य नागरिक इतर फळांना पसंती देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कोरोनाचे संकट पूर्णपणे संपल्यानंतरच पूर्ववत खरेदी-विक्री होईल, असा अंदाज फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केला.

येथून येतोय माल
मुंबईमध्ये हिमाचल प्रदेश व काश्मीरमधून सफरचंद विक्रीसाठी येत आहे. औरंगाबाद व इतर परिसरातून मोसंबी, अहमदनगर, सोलापूर परिसरातून डाळिंब व पुणे परिसरातून सीताफळ विक्रीसाठी येत आहेत. इतर राज्यांतून ही फळे विक्रीसाठी येत आहेत.

Web Title: Consumers turn to fruit market due to inflation; There is not enough income even during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.