कळंबोली सर्कल येथे कंटेनरला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:40 PM2020-02-09T23:40:14+5:302020-02-09T23:40:55+5:30
रस्त्यावर सांडले डिझेल : अनेक दुचाकी घसरल्या; डिझेल चोरीचे असल्याचा संशय
कळंबोली : कळंबोली सर्कल येथे पहाटे ५ च्या सुमारास जेएनपीटीकडून भरधाव आलेल्या कंटेनरला अपघात झाल्याने तो रस्त्यावर पलटी झाला. आतील डिझेल वाहू लागल्याने रस्त्यावर सर्वत्र डिझेल पसरले होते. कंटेनरमधून डिझेल वाहतूक केली
जात असल्याने हे डिझेल चोरीचे असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. याबाबत कळंबोली पोलीस तपास करत आहेत.
कळंबोली सर्कललगत आशिया खंडातील मोठे स्टील मार्केट आहे. देशभरातून अवजड वाहने स्टील मार्केटमध्ये येतात. त्याचबरोबर दिवसरात्र अवजड वाहनांची रेलचेल सुरूच असते. यात ट्रक, कंटेनर, टँकर, ट्रेलरचा समावेश आहे. दररोज मार्केटमधून कोट्यवधींची उलाढाल होत असते. चोरीचा माल तसेच डिझेलची वाहतूक होत असल्याचे रविवारी डिझेल कंटेनरला झालेल्या अपघातातून उघड झाले आहे.
रविवारी पहाटे ५ च्या सुमारास जेएनपीटीकडून मुंब्य्राकडे एम एच ४ एफ पी १४६६ या क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने आला. कळंबोली सर्कल येथे चालकांचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर आडवा झाला. त्यामुळे आतील डिझेल रस्त्यावर वाहू लागले. कंटेनरमध्ये प्लास्टिक पिशव्यामध्ये पॅकिंग करून खताच्या गोण्यामध्ये बांधून डिझेलची वाहतूक केली जात होती. अपघात झाल्याने संपूर्ण रस्ता डिझेलने माखला होता.
डिझेल पाण्यासारखे वाहत असल्याने भरून घेण्याकरिता लोकांची गर्दी झाली. घटनास्थळी हवालदार सुधाकर बोंबले, दीपक गायकवाड, प्रकाश भोरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आडवा झालेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला केला. या वेळी अग्निशमन दलालाही बोलवण्यात आले होते. हे डिझेल चोरीचे किंवा काळ्या बाजाराचे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कळंबोली पोलिसांनी त्यांचे नमुने घेतले असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चारचाकीने घेतला पेट
च्कळंबोली सर्कल येथे डिझेल वाहून नेणाºया कंटेनरचा अपघात झाला. त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेल वाहून संपूर्ण रस्ता माखला होता.
च्डिझेल सांडलेल्या रस्त्यावरून जाणाºया एका चारचाकी कारने अचानक पेट घेतला.
च्अग्निशमक दलाने त्वरित आग विझवल्याने अनर्थ टळला. मात्र, डिझेलमुळे अनेक दुचाकीस्वारही या ठिकाणी घसरले.
च्पोलीस तसेच अग्निशमन दलाने त्वरित उपाययोजना केल्याने या ठिकाणी जीवितहानी घडली नाही.