शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कंटेनर ट्रेलर कोसळून वाहनचालकाचा जागीच मृत्यू, जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:49 PM

ट्रेलर पुलाखाली कोसळण्यापूर्वीच क्लिनरने प्रसंगावधान राखून सुरक्षितरीत्या उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, कंटेनर चालकाला जीव वाचविणे शक्य झाले नाही.

उरण : जेएनपीटी-गव्हाण फाटा उड्डाणपुलाववर शनिवारी रात्री वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर ट्रेलर थेट मालवाहतूक करणाऱ्या  रेल्वे मार्गावर पडला. सुमारे ४० फूट उंचीवरून कोसळून झालेल्या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प झाली होती. ट्रेलर पुलाखाली कोसळण्यापूर्वीच क्लिनरने प्रसंगावधान राखून सुरक्षितरीत्या उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, कंटेनर चालकाला जीव वाचविणे शक्य झाले नाही. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कुर्ला, पनवेल येथील २०० कामगार तसेच पोलीस, वाहतूक पोलीस यंत्रणा घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. अंधारातच कर्मचाऱ्यांनी हायड्रो क्रेनच्या साहाय्याने रुळावर पडलेला कंटेनर ट्रेलर बाजूला  केला. त्यानंतर अवघ्या अडीच तासातच युद्धपातळीवर रुळांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, २५०० हाय व्होल्टेजच्या तुटलेल्या ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होते.या अपघातानंतर जेएनपीटीची पहिली मालवाहू ट्रेन सकाळी ७.३० वाजता रवाना झाली. त्याआधी डिझेल इंजिनवर धावणारी मालगाडी पहाटे ५.३० वाजता रवाना झाली असल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. रुळावरून पडलेला कंटेनर ट्रेलर तत्काळ बाजूला सारून अडथळा दूर करण्यात आल्याने जेएनपीटीच्या रेल्वे मालाच्या वाहतुकीवर कोणताही फारसा परिणाम झाला नसल्याचा दावा आयसीडीचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी केला. 

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वे