मुंबई-रेवस लाँच सेवा सुरू, प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:19 AM2017-09-08T03:19:14+5:302017-09-08T03:19:36+5:30
पावसाळ्यातील वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने बंद असणारी मुंबई - रेवस लाँच सेवा सोमवारपासून सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अलिबाग : पावसाळ्यातील वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने बंद असणारी मुंबई - रेवस लाँच सेवा सोमवारपासून सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर मुंबईस जाणा-या प्रवाशांनी या लॉन्च सेवेचा लाभ घेतला.
मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था मुंबई यांच्या माध्यमातून ही लॉन्च सेवा मुंबई भाऊचा धक्का ते रेवस या जलमार्गावर चालविण्यात येते. सध्या भाऊचा धक्का येथून सकाळी ६ ते दुपारी २.३० च्या दरम्यान या लॉन्चेस रेवसकरिता सुटतात व परत भाऊच्या धक्क्यास जातात. हवामान पाहून लाँच सेवा संध्याकाळी वाढविण्यात येणार आहे. पावसाळ््यात लाँच सेवा बंद ठेवण्यात येते, तेव्हा प्रवाशांना एसटीने पनवेल मार्गे मुंबई असा प्रवास अनेक समस्यांना सामोरे जावून करावा लागत असे. मात्र मुंबई रेवस लाँच सेवा सुरू झाल्याने अवघ्या एक ते दीड तासात मुंबई प्रवास शक्य होत असल्याने प्रवासीवर्र्ग समाधानी आहे.