नवी मुंबईसह पनवेलमध्ये पावसाची संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 03:22 AM2020-07-16T03:22:44+5:302020-07-16T03:23:10+5:30
सायन-पनवेल, कळंबोली-मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्गांवर काही ठिकाणी यावेळी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले.
नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबई विभागात मागील दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पनवेलमध्ये दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तर नवी मुंबईत दोन ठिकाणी किरकोळ आगीच्या घटना घडल्या. पावसाळा सुरु झाल्यापासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १०६१.१२ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारी ८0 मी.मी पावसाची नोंद झाली आहे.
सायन-पनवेल, कळंबोली-मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्गांवर काही ठिकाणी यावेळी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. लॉकडाऊनमुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने कोठेही वाहतूककोंडी झाली नाही. तालुक्यातील गाढी, तसेच कासाडी नदी दुथडी भरून वाहत होती.