नवी मुंबई : महापालिकेच्या विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना खूशखबर आहे. या सर्व कामगारांना किमान वेतनातील १३ महिन्यांच्या फरकाची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. ३0 जुलै २0१८ रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु त्याची अंमलबजावणी कधी होणार याबाबत कर्मचाºयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याने कर्मचाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या २४ फेबु्रवारी २0१५ रोजीच्या अधिसूचनेनुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने १५ फेब्रुवारी २0१७ रोजी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करून कामगारांच्या वर्गवारीनुसार किमान वेतन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. १९ मे २0१७ रोजीच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कंत्राटी कामगारांना किमान वेतनातील फरकाची रक्कम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. असे असले तरी ३0 जुलै २0१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील १३ महिन्यांच्या फरकाची रक्कम देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. परंतु त्यावर कार्यवाही कधीपासून होणार याबाबत कर्मचाºयांत संभ्रम होता. मात्र अवघ्या दहा दिवसांतच आयुक्तांनी या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.>दहा दिवसांतच या प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी दिले निर्देश
महापालिकेतील कंत्राटी कामगारांना खूशखबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 2:00 AM