नवी मुंबई : खारघर येथे राहणाºया (१६) या तरु णाचा मोटारसायकल घसरून अपघात झाला होता. नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असताना, ब्रेन डेड (मेंदू मृत) झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, दु:खातही मुलाचे अस्तित्व टिकविण्याचा निर्णय घेऊन त्याचे यकृत आणि दोन मूत्रपिंड दान केल्याने तिघांना जीवदान मिळाले आहे. अवयवदान करणाºया तरु णाचे नाव जेफरीन जोसी आहे.
खारघर येथे राहणारा व अकरावीत शिकणाºया जेफरीनचा ३ डिसेंबर रोजी दुचाकी घसरून अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील रु ग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा ब्रेन डेड झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टर अमित नागपाल, डॉ. अशोक कुमार आणि डॉ. जयेंद्र यादव यांनी, कायद्यातील तरतुदीनुसार त्याला ब्रेन डेड घोषित केले.
अवयवदानच्या माध्यमातून जेफरीनचे अस्तित्व टिकून राहावे, तसेच गरजू रुग्णांना जीवदान मिळावे, यासाठी झोनल ट्रान्सप्लांट को-ओर्डिनेशन कमिटीने जेफरीनच्या आईवडिलांचे समुपदेशन केले. त्यांनी यास होकार दिल्याने ९ डिसेंबर रोजी जेफरीनचे यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात आले आहेत. सदर शस्त्रक्रि या डी. वाय. पाटील रुग्णालयातच करण्यात आली. शस्त्रक्रि या करताना दहा डॉक्टरांची टीम कार्यरत होती. यामध्ये रुग्णालयातील डॉ. कैलास जवादे, ताहेर शेख आणि रखबीरसिंग गेदु आदी डॉक्टर सहभागी होते.
ट्रान्सप्लांट को-ओर्डिनेशन कमिटीच्या मार्गदर्शनानुसार जेफरीनचे यकृत मुंबईतील कोकिलाबेन रु ग्णालयात पाठविण्यात आले असून, दोन्ही मूत्रपिंड व्होकार्ड रुग्णालय, मुंबई येथील रुग्णांसाठी पाठविण्यात आले असून, तिघांना जीवदान मिळणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील रुग्णालयाचे सीईओ डॉ. राहुल पेड्डावाड यांनी दिली. अंत्यविधीसाठी जेफरीनचा मृतदेह मंगळवारी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
अपघातामध्ये मी, माझ्या मुलाला गमावले आहे. अवयवदानच्या माध्यमातून मृत्यूनंतरही त्याचे अस्तित्व राहणार आहे. इतर रु ग्णांना जीवदान मिळणार असल्याने आम्ही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.- एलिझाबेथ जोसी,जेफरीनची आई
तरुणांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहने चालविताना काळजी घ्यावी. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरावे, हेल्मेट आपल्या संरक्षणासाठी आहे. आमच्यावर आलेला प्रसंग इतर कोणावरही येऊ नये.- सॅबेस्टियन जोसी, जेफरीनचे वडील