नवी मुंबई : अनधिकृत बांधकाम होत असल्यास तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त रामास्वामी एन. यांनी सर्व अधिकाºयांना दिल्या आहेत. अतिक्रमणास पाठीशी घातल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.आयुक्तांनी आठही विभाग कार्यालयाच्या हद्दीतील जनतेशी थेट संबंध असलेल्या सेवा व नागरी सुविधांची पूर्तता यांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये शहरात एकही अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या. बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ नोटीस देण्यात यावी व नोटीसचा कालावधी संपण्यापूर्वीच संबंधित बांधकाम निष्कासित करावे, असे आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकामांवर निर्बंध ठेवण्यासाठी विभाग पातळीवर अधिकारी व कर्मचाºयांच्या जबाबदाºया निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या जबाबदारीमध्ये कसूर केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग व बॅनर्सही हटविण्यात यावेत.विद्युत खांबांवर व इतर ठिकाणी असलेल्या अनधिकृत जाहिरातबाजीवरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही नियमित कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी सर्व विभाग अधिकाºयांना दिला आहे.अतिक्रमण रोखण्याकडे कोणीही दुर्लक्ष केले. डेब्रिज, फेरीवाले, होर्डिंग पासून सर्व प्रकारच्या बांधकामांवर नियंत्रण ठेवले नाही तर अधिकारी व कर्मचाºयांना निलंबित करण्याचा इशाराही दिला आहे.
अतिक्रमणावर नियंत्रण ठेवा अन्यथा कारवाई, अधिकाऱ्यांना आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:06 AM