शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

पनवेलमध्ये खतकुंड्यांचे कचरा कुंडीत रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:31 PM

पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत.

कळंबोली : पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. परंतु या खतकुंड्यांचे रूपांतर कचरा कुंड्यात झाले आहे. खतनिर्मितीच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या कुंड्यात आता कचरा साठवला जात आहे. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेने फक्त दिखाऊगिरी केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत. त्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, छोटा खांदा, मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच महापालिकेतील समाविष्ट २९ गावांमध्ये ८0 पेक्षा जास्त कुंड्या बांधण्यात आल्या आहेत. या कुंड्यात ओला कचरा तसेच पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येणार होते. तयार झालेले खत महापालिका क्षेत्रातील उद्यान, झाडांसाठी उपयोग केला जाणार होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खत तयार झाले तर ते विकण्याचेही प्रयोजन महापालिकेने आखले होते. दोन वर्ष झाले तरी बांधलेल्या खतकुंड्यांत कधीच खत निर्माण झाले नाही. स्वच्छ सर्वेक्षणात फक्त दिखाऊगिरी महापालिकेने केली असल्याची चर्चा पनवेलमध्ये रंगत आहे. महापालिका हद्दीतील बऱ्याच खतकुंड्यांत कचरा टाकल्याचे दिसून येत आहे. नागरिक सर्रासपणे या कुंड्यात प्लॅस्टिक, बाटल्या, घरगुती टाकाऊ कचरा, कपडे इतर कचराही यात टाकला जात आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी आत साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे खांदा वसाहतीतील रहिवासी उमेश मालुसरे यांनी लोकमतला सांगितले. महापालिकेने दिखाऊगिरी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप मालुसरे यांनी केला. तसे पाहता महापालिकेने केलेला प्रयोग फसल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांना संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.>एका खतकुंडीला 20 हजार केलेला खÞर्च पाण्यात : पनवेल महापालिका क्षेत्रात 80 खतकुंड्या बांधण्यात आल्या होत्या . त्या बांधण्यातरिता एका खतकुंडीस 20 हजार रु पये खÞर्च करण्यात आले होते. लाखों रु पये खÞर्च करु न सुध्दा या कुंड्यांचा वापर कचरा साठवण्यासाठी केला जात आहे. लाखों रु पये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापन तर झाले नाही . परंतू एक शोभेची वस्तू बनून खतकुंड्या कच-यात पडल्या आहेत.>दोन वर्षे खतकुंड्या कचºयात पडूनदोन वर्षाअगोदर पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या संकल्पनेतून या कुंड्या बांधण्याचे काम करण्यात आले होते. शिंदे यांच्या बदलीनंतर महापालिकेने दुर्लक्ष केले. दोन वर्षे झाली तरी या कुंड्यांचा खत बनवण्याकरिता वापर केला नाही. तर कचराकुंडी म्हणूनच वापर केला जात आहे.