टाकावू पासून टिकाऊ संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या बसेसचे शौचालयात रूपांतर
By नारायण जाधव | Published: December 6, 2023 07:09 PM2023-12-06T19:09:58+5:302023-12-06T19:10:42+5:30
महिला व पुरुषांकरिता अत्याधुनिक २ बस टॉयलेटचे लोकार्पण : आ. मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा.
नवी मुंबई – भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त देशभरात विकास कामांचा अहवाल जनतेच्या घरा घरात पोहचविण्याचे काम चालू आहे. तसेच न.मुं.म.पा च्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या “टाकाऊ पासून टिकाऊ” या संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या बसेसचे रूपांतर करून महिला व पुरुषांकरिता २ बसेस उपलब्ध करून डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्य भूमीवर जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसुविधा करिता न.मुं.म.पा.चे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते बसचे उदघाटन झाले.
महापालिका आयुक्त यांनी सांगितले की, आज आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून ज्या महापालिकेच्या परिवहन विभागातील मोडकळीस आलेल्या बसेसचे रुपांतर टॉयलेटमध्ये करून महिला व पुरुषांकरिता शौचालय उपलब्ध करून दिले यामुळे सायन-पनवेल हायवेमार्गावरील प्रवासांना एक सुविधा उपलब्ध झाली. अजून अश्या जुन्या बसेसची गरज लागेल त्यावेळेस महापालिकेच्या वतीने मोडकळीस आलेल्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातील.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, जुईनगर हायवे लगत लांब पल्ल्याच्या खाजगी बसेस उभ्या असतात व नवी मुंबईतील असंख्य नागरिक हे सायन-पनवेल हायवे मार्गाने प्रवास करतात. जेणेकरुन विशेषत: येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांसाठी तिथे शौचालायची व्यवस्था नसते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला पुरुष यांच्यासाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक बस टॉयलेट व्हावे म्हणून जशी एका स्त्रीला लाली टिकली पावडर लावून सजवितात तश्याच प्रकारे माझ्या आमदार निधीमधून आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागामधील मोडकळीस आलेल्या बसेसचे टॉयलेटमध्ये रुपांतर करून महिला व पुरुषांसाठी 2 बसेसचे लोकार्पण झाले.
सायन-पनवेल हायवे लगत जिथे नागरिकांची मोठ्या संख्येने प्रवासांची ये-जा असते त्या ठिकाणी 20 बसेसची व्यवस्था व प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार म्हात्रे यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुनील पाटील, कुणाल महाडिक, राजेश राय, राजेश पाटील, पांडुरंग आमले, विनायक गिरी, दर्शन भारद्वाज, सुभाष गायकवाड, निलेश पाटील, विनोद शहा, प्रमोद जोशी, जयश्री चित्रे, मनोज मेहेर, संदीप मेहेर असंख्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.