कोपर ग्रा. पं. काँग्रेसच्या ताब्यात
By admin | Published: April 19, 2016 02:25 AM2016-04-19T02:25:05+5:302016-04-19T02:25:05+5:30
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अनुषंगाने पेणमधील कोपर ग्रामपंचायत काँग्रेसने शेकापच्या ताब्यातून हिसकावून घेत काँग्रेसने एकूण निवडणूक झालेल्या पाच
पेण : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अनुषंगाने पेणमधील कोपर ग्रामपंचायत काँग्रेसने शेकापच्या ताब्यातून हिसकावून घेत काँग्रेसने एकूण निवडणूक झालेल्या पाच जागांपैकी चार जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
पेणमधील कोपर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक छोटी पण विजयाचा आवाका मोठा ठरणारी अशीच झाली. कोळी समाजाचे प्रतिनिधित्व जातीच्या दाखल्यात अडकले व दोन जागा रिक्त राहिल्या. उर्वरित पाच जागांमध्ये प्रभाग क्र. ३ मधून गिरीश मोकल खुला गट ही जागा काँग्रेसला बिनविरोध देण्यात शेकापचे काय राजकारण होते, हा राजकीय संशोधनाचा विषय ठरला. या बिनविरोध आलेल्या जागेतून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऊर्जा घेतली, ती शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवली.
चार जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार दमयंती म्हात्रे यांनी शेकापच्या रेश्मा म्हात्रे यांचा २७५ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे दुसरे उमेदवार कल्याण पाटील यांनी ५१५ मते मिळवून उच्चांक प्रस्थापित केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार सुगंधा भोईर यांचा पराभव के ला.काँग्रेसचे राकेश म्हात्रे यांना १७० मते तर शेकापचे महेश म्हात्रे यांना १७१ मते मिळाली. प्रभाग २ मधील लढत उत्कंठावर्धक ठरून शेकापचे महेश म्हात्रे विजयी झाले.