कोरोनामुळे नवी मुंबईतील भाडेकरूंच्या संख्येत झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:02 AM2021-01-02T00:02:05+5:302021-01-02T00:02:13+5:30

त्यात राज्याच्या विविध भागांतील, तसेच परराज्यातील कुटुंबांचा समावेश होता.

Corona has reduced the number of tenants in Navi Mumbai | कोरोनामुळे नवी मुंबईतील भाडेकरूंच्या संख्येत झाली घट

कोरोनामुळे नवी मुंबईतील भाडेकरूंच्या संख्येत झाली घट

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : कोरोनामुळे शहरातील भाडेकरूंच्या कुटुंबांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. लॉकडाऊनची घोषणा होताच, कोरोनाच्या भीतीने अथवा उदरनिर्वाहाच्या चिंतेने अनेकांनी सहकुटुंब गाव गाठले होते. त्यापैकी अनेकांनी अद्यापही नवी मुंबईकडे पाठ फिरविल्याने भाडेकरूंच्या नोंदीची संख्या घसरली आहे.

त्यात राज्याच्या विविध भागांतील, तसेच परराज्यातील कुटुंबांचा समावेश होता. या दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी दीड लाख ई-पास मंजूर केले होते. कालांतराने कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागताच, त्यापैकी बहुतांश व्यक्तींनी सहकुटुंब पुन्हा नवी मुंबई गाठली. मात्र, अद्यापही बहुतांश कुटुंबे मूळ गावीच स्थायिक झाले आहेत. त्यामध्ये शहराच्या विविध भागांत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबांचाही समावेश आहे. त्यांनी अद्यापही नवी मुंबईकडे पाय वळविले नसल्याने भाडेकरूंच्या घरांची नोंदणी घसरली आहे.
एप्रिल व मेमध्ये एकाही नव्या भाडेकरूंची नोंद झालेली नाही, तर जूनमध्ये काही प्रमाणात जनजीवन सुरळीत होताच, संपूर्ण परिमंडळ एक मध्ये अवघ्या ७६ नव्या भाडेकरूंची नोंद झाली. त्यानंतर, ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात नोंदी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नेरुळ, सानपाडा, सीबीडी व रबाळे पोलीस ठाणे हद्दीत एप्रिल ते ऑगस्टदरम्यान एकही नव्या भाडेकरूची नोंद झालेली नाही. 

२०१९ मध्ये नवी मुंबईत (परिमंडळ १) ४७ हजार ३८७ भाडेकरूंची नोंद झाली होती. प्रतिवर्षी भाडेकरू बदलला जात असल्याने, शिवाय पोलिसांकडे नव्याने नोंद होत असल्याने, २०२० मध्ये ४७ हजारांच्या जवळपास भाडेकरूंची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या भीतीने अथवा लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहाच्या चिंतेने बहुतांश भाडेकरूंनी गाठलेले गाव अद्याप सोडलेले नाही. परिणामी, शहरातील भाडेकरूंच्या नोंदीची संख्या निम्म्यावर घसरली आहे. त्यात एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतल्या भाडेकरूंच्या  संख्या सर्वाधिक सर्वाधिक आहे. २०१९ मध्ये उलवे व बेलापूर गावठाण लगतच्या नव्याने विकसित भागात १७ हजार ९८७ भाडेकरू  होते. मात्र, २०२० मध्ये मार्चनंतर नोंदी कमी होऊन वर्षभरात केवळ ७ हजार ४२९ भाडेकरूंची नोंद झाली आहे.

Web Title: Corona has reduced the number of tenants in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.