शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

कोरोनामुळे नवी मुंबईतील भाडेकरूंच्या संख्येत झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 12:02 AM

त्यात राज्याच्या विविध भागांतील, तसेच परराज्यातील कुटुंबांचा समावेश होता.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनामुळे शहरातील भाडेकरूंच्या कुटुंबांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. लॉकडाऊनची घोषणा होताच, कोरोनाच्या भीतीने अथवा उदरनिर्वाहाच्या चिंतेने अनेकांनी सहकुटुंब गाव गाठले होते. त्यापैकी अनेकांनी अद्यापही नवी मुंबईकडे पाठ फिरविल्याने भाडेकरूंच्या नोंदीची संख्या घसरली आहे.

त्यात राज्याच्या विविध भागांतील, तसेच परराज्यातील कुटुंबांचा समावेश होता. या दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी दीड लाख ई-पास मंजूर केले होते. कालांतराने कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागताच, त्यापैकी बहुतांश व्यक्तींनी सहकुटुंब पुन्हा नवी मुंबई गाठली. मात्र, अद्यापही बहुतांश कुटुंबे मूळ गावीच स्थायिक झाले आहेत. त्यामध्ये शहराच्या विविध भागांत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबांचाही समावेश आहे. त्यांनी अद्यापही नवी मुंबईकडे पाय वळविले नसल्याने भाडेकरूंच्या घरांची नोंदणी घसरली आहे.एप्रिल व मेमध्ये एकाही नव्या भाडेकरूंची नोंद झालेली नाही, तर जूनमध्ये काही प्रमाणात जनजीवन सुरळीत होताच, संपूर्ण परिमंडळ एक मध्ये अवघ्या ७६ नव्या भाडेकरूंची नोंद झाली. त्यानंतर, ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात नोंदी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नेरुळ, सानपाडा, सीबीडी व रबाळे पोलीस ठाणे हद्दीत एप्रिल ते ऑगस्टदरम्यान एकही नव्या भाडेकरूची नोंद झालेली नाही. 

२०१९ मध्ये नवी मुंबईत (परिमंडळ १) ४७ हजार ३८७ भाडेकरूंची नोंद झाली होती. प्रतिवर्षी भाडेकरू बदलला जात असल्याने, शिवाय पोलिसांकडे नव्याने नोंद होत असल्याने, २०२० मध्ये ४७ हजारांच्या जवळपास भाडेकरूंची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या भीतीने अथवा लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहाच्या चिंतेने बहुतांश भाडेकरूंनी गाठलेले गाव अद्याप सोडलेले नाही. परिणामी, शहरातील भाडेकरूंच्या नोंदीची संख्या निम्म्यावर घसरली आहे. त्यात एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतल्या भाडेकरूंच्या  संख्या सर्वाधिक सर्वाधिक आहे. २०१९ मध्ये उलवे व बेलापूर गावठाण लगतच्या नव्याने विकसित भागात १७ हजार ९८७ भाडेकरू  होते. मात्र, २०२० मध्ये मार्चनंतर नोंदी कमी होऊन वर्षभरात केवळ ७ हजार ४२९ भाडेकरूंची नोंद झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई