शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

नवी मुंबईत कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर कमी, शहरातील नागरिक बेफिकीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 9:11 AM

नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती.

योगेश पिंगळे -नवी मुंबई :  शहरातील नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरची मागणी गेल्यावर्षी ८० ते ८५ टक्क्यांवर पोहचली होती परंतु विविध कारणांमुळे ही विक्री देखील १० ते १५ टक्क्यांवर आली आहे.नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती. त्यामुळे सॅनिटायझरने हातांची स्वच्छता केल्यास सुरक्षित राहिले जाऊ शकते अशी नागरिकांची समजूत झाली होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सॅनिटायझरचा वापर करू लागला होता. सॅनिटायझरच्या  वाढलेल्या मागणीमुळे बाजारात अनेक ठिकाणी सॅनिटायझरची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे कंपन्यांनी सॅनिटायझरचे दर देखील वाढविले होते. नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने शासनाच्या सूचनेनुसार दर निम्मे करण्यात आले होते. याकाळात शासन, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करताना  सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर काही प्रमाणात सॅनिटायझरची मागणी घटली. कोरोनाकाळात कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक स्वतःकडे सॅनिटायझर बाळगत होते परंतु आता अनेक नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत.  तसेच सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत. 

सॅनिटायझरची विक्री १५ टक्क्यांवरकोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हातांची स्वच्छता करण्यासाठी सॅनिटायझरला प्राधान्य दिले जात होते. सॅनिटायझरची  मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी बाजारात विविध सुगंध, रंगांचे सॅनिटायझर विक्रीसाठी आणले होते. सुरुवातीला यांचे दर देखील जास्त होते. तरी देखील नागरिक सॅनिटायझर खरेदी करत होते. परंतु आता नागरिक कोरोनाची भीती नसल्यासारखे वागत असून पूर्वीप्रमाणे नियमाचे आणि स्वच्छतेचे पालन करत नाहीत.  त्यामुळे सॅनिटायझरचा वापर देखील कमी झाला असून पूर्वीच्या तुलनेत सॅनिटायझरची विक्री सुमारे १५ टक्क्यांवर आली आहे.  

कोरोनाच्या सुरुवातीला सॅनिटायझर फक्त मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होते. आता सर्वच दुकानांमध्ये विक्री होत आहे. गेल्यावर्षी सॅनिटायझरला प्रचंड प्रमाणात मागणी होती. परंतु कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नसताना काही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, अनेक नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. अनेकांना सॅनिटायझर परवडत नसल्याने साबण वापरत आहेत. अशा विविध कारणांमुळे पूर्वीच्या तुलनेत सॅनिटायझरच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.- राकेश नलावडे, नवी मुंबई केमिस्ट असोसिएशन - अध्यक्ष

आम्ही साबण वापरायला लागलोकोरोनापासून संरक्षण होण्यासाठी आता साबणाचा वापर करतो. कार्यालय, बँक आदी ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या सॅनिटायझरचा वापर करतो.- शशिकांत म्हात्रे, नागरिक

कोरोनाकाळात घरात वापरासाठी सॅनिटायझर खरेदी करत होतो.  परंतु साबणाच्या तुलनेत सॅनिटायझर महाग असल्याने घरी स्वच्छतेसाठी साबण वापरतो.  परंतु घराबाहेर जाताना सोबत सॅनिटायझर बाळगून त्याचा वापर करतो.- अक्षय बारवे, नागरिक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस