नवी मुंबई : एपीएमसीतील धान्य मार्केटमधील व्यापाºयास कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नवी मुंबईमधील रुग्णांची संख्या ५९ झाली आहे.
एपीएमसीच्या धान्य मार्केटमधील एल विंगमधील ६२ वर्षाच्या व्यापाºयास लागण झाली. तो सानपाडा सेक्टर १८ मध्ये राहतो. एल विंग सील केली आहे. व्यापाºयाचे निवासस्थान असलेली इमारत कन्टेनमेंट झोन केली. धान्य मार्केटमधील व्यापारी नियमीतपणे मार्केटमध्ये येत असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यास सुरवात केली आहे. एपीएमसीतील व्यापाºयासह एकूण ५ रुग्ण शुक्रवारी नवी मुंबईमध्ये आढळले . दिवागाव मधील रूग्णाच्या संपर्कात आलेली एक महिला व दोन पुरुषांनाही लागण झाली आहे. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी असलेल्या महिलेस संसर्ग झाला असून तिच्या संपर्कात आलेल्यांचेही स्वॅब टेस्टींगसाठी पाठविण्यात आले आहेत.मार्केट सुरूच राहणारधान्य मार्केटमध्ये रुग्ण सापडल्यानंतर व्यापारी, बाजारसमिती अधिकाºयांची पोलीस उपआयुक्त कार्यालयात सायंकाळी बैठकही पार पडली. मार्केट सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रूग्ण सापडलेली एक विंग बंद ठेवण्यात येणार आहे. मार्केटमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.एपीएमसीमध्ये प्राथमिक तपासणी सुरूमुंबई बाजार समिती मधील कामगार व व्यापाºयांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. शुक्रवारी फळ मार्केटमधील कामगारांची प्राथमीक तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून शनिवारपासून प्रत्येक मार्केटमध्ये तपासणी सुरू केली जाणार आहे..