- नामदेव मोरेनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा, यासाठी शासन प्रत्येक वर्षी निर्यातीला प्रोत्साहन देत असते; परंतु २०१९-२० या आर्थिक वर्षात निर्यातीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल ४९ लाख ६ हजार ३५३ टन निर्यात घसरली आहे. १५,०६३ कोटी ९९ लाख रुपयांनी उलाढाल कमी झाली असून, याचा फटका शेतकºयांनाही बसला आहे.कृषिमालाची निर्यात वाढल्यास देशांतर्गत बाजारपेठेमध्ये शेतकºयांच्या मालास चांगला भाव मिळेल, या उद्देशाने शासन निर्यातीला प्रोत्साहन देत असते. कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) माध्यमातून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल २ कोटी ३० लाख ८४ हजार ६९० टन कृषिमालाची निर्यात करून १ लाख ३० हजार ३८७ कोटी रुपयांची उलाढाल करण्यात यश आले होते; परंतु २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये विविध कारणांनी निर्यातीमध्ये घट झाली आहे. वर्षभरामध्ये १ कोटी ८१ लाख ७८ हजार ३३६ टन कृषिमालाची निर्यात झाली असून, त्या माध्यमातून १ लाख १५ हजार ३२३ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये ४९ लाख टन निर्यात घसरून उलाढालही १५,०६३ कोटी रुपयांनी कमी झाली आहे.सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनामुळे निर्यात कोलमडली आहे. निर्यात पुरेशी होत नसल्याने आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्येही कृषिमालास योग्य भाव नसल्याने वर्षभर शेतकºयांचे नुकसान होत राहण्याची शक्यताआहे.तांदळात मोठी घसरणगत आर्थिक वर्षात कांदा निर्यातीमधून ३,४६८ कोटी उलाढाल झाली. देशांतर्गत कांद्याचे दर वाढल्याने शासनाने निर्यातीवर बंदी घातली. निर्यात घसरून उलाढाल २,३२० कोटींवर आली. आर्थिक वर्षात १,१४८ कोटीने उलाढाल घसरली. सर्वाधिक निर्यात बासमतीसह इतर तांदळाची होते. त्यात मोठी घसरण झाली. बासमतीची उलाढाल ३२,८०४ कोटींवरून ३१,०२५ कोटींवर व इतर तांदळाची उलाढाल २१,१८५ कोटींवरून १४,३६४ कोटींवर आली आहे,.कांद्याचा दर वाढल्याने शासनाने निर्यात कमी केली. फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीमध्ये रासायनिक अंश व इतर अडचणींमुळे अपेक्षित वाढ झाली नसल्याने, २०१९-२० मध्ये निर्यात कमी झाली होती. २०२०-२१च्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट आल्यामुळे आंबा, कलिंगडासह इतर फळ, भाजी व कृषिमालाची निर्यात रोडावली असून, पुढील वर्षी याहीपेक्षा निर्यात घसरेल.- संजय पानसरे,संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर्षनिहाय निर्यातीचा तपशीलसन २०१८ - १९ (आकडेवारी संदर्भ अपेडा संकेतस्थळ)उत्पादन निर्यात (टन) उलाढाल (कोटी)भाजीपाला व फळे ३५८८४२३ १०,२३७प्रक्रियायुक्त भाजी, फळे ११९६०३९ ९,१९६अन्नधान्य १३५१७४९१ ५६,८४१फुले ३५८७७ १,४२०दूध व प्राणिजन्य वस्तू १९९९०८४ ३०,६३२इतर प्रक्रियायुक्त पदार्थ २७४७७७३ २२,०५९सन २०१९-२०ची निर्यातउत्पादन निर्यात (टन) उलाढाल (कोटी)भाजीपाला व फळे २६२५५८७ ९,१८२प्रक्रियायुक्त भाजी, फळे ११२४५३२ ९,२०६अन्नधान्य १०२१४२०१ ४७,२८७फुले ३१७४५ १,२६५दूध व प्राणिजन्य वस्तू १६४५३८६ २६,३८३इतर प्रक्रियायुक्त पदार्थ २५०६८८३ २१,९९८
कोरोनामुळे कृषिमालाची निर्यात घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:40 AM