शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी कसरत सुरू; नुकसान भरून काढण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:39 AM

Corona Lockdown Effect on Industry: कामगारांची कमतरता : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते.

नामदेव माेरे नवी मुंबई  : ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सहा  महिन्यांत झालेले प्रचंड आर्थिक नुकसान भरून काढण्याचे आव्हान उद्योजकांसमोर उभे राहिले आहे. कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी कामगार उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका औद्योगिक वसाहतींना बसला होता. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ४५०० कारखाने आहेत. अत्याश्यक सेवा देणारे कारखाने वगळता इतर सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील व इतर राज्यांतील कामगारही त्यांच्या मूळ गावी गेले होते. अद्याप ५० टक्के कामगार कामावर येऊ शकलेले नाहीत. यामध्ये इतर राज्यांतील कामगारांची संख्या मोठी आहे. कामगारच नसल्यामुळे शासनाने परवानगी देऊनही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नाहीत. कामगारांना घेऊन येण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही उद्योजकांनी केली आहे. अनेकांनी खासगी बसेसनी कामगारांना घेऊन येण्याची तयारी सुरू केली आहे. 

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित ८०४ कारखान्यांमधील काही कारखाने सुरू  झाले असून, काही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कामगारांची कमतरता हीच प्रमुख समस्या सध्या मोठ्या प्रमाणात सर्वांसमोर आहे. 

कुठल्या क्षेत्रात उद्योग सुरू ?

नवी मुंबई व तळोजामध्ये लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग सुरू होते. उत्पादन करणारे कारखाने बंद होते. शासनाने आदेश दिल्यानंतर सर्व कारखाने सुरू होत आहेत. आयटी कंपन्या, सेवा उद्योग व छोटे कारखाने सुरू झाले आहेत

दिवाळीपर्यंत सर्व सुरळीत होईल 

औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने सहा महिने बंद होेते. बंद कारखाने सुरू करताना कामगारांची कमतरता सर्वांनाच जाणवू लागली आहे. याशिवाय कारखान्यांची देखभाल-दुरुस्ती, कच्चा माल व इतर काही समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागेल. 

तळोजामध्ये  50000कोटींचा फटका बसला

नवी मुंबईमधील ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील  अनेक कारखाने लाॅकडाऊनच्या काळात बंद होेते. सहा महिन्यांत तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. नवी मुंबईमध्ये यापेक्षाही जास्त व्यवहार ठप्प झाले असण्याची शक्यता आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनुष्यबळाची कमतरता हे कारण प्रमुख आहे. गावी गेलेल्या कामगारांना परत  आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परराज्यातील कामगारांना आणण्यासाठी वाहतुकीची समस्या जाणवत आहे. - के. आर. गोपी, अध्यक्ष, टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (टीएमआयए)

तळोजातील अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित कारखाने सुरू करण्यासही परवानगी मिळाली आहे. कामगार व इतर काही अडचणींमुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू होत नाहीत. पुढील एक महिन्यात सर्व व्यवहार सुरू होऊ शकतील. - सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या