कचराकुंडीत फेकला कोरोनाचा जैविक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:15 AM2020-08-08T01:15:57+5:302020-08-08T01:16:19+5:30
नवी मुंबईमधील प्रकार : निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
नवी मुंबई : महानगरपालिका व काही खासगी रुग्णालयातील कोरोनाचा जैविक कचरा ही कचराकुंडीत टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपाने ठेकेदाराला वाढीव मुदत न दिल्याने कचरा उचलला जात नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे, परंतु मनपातील काही अधिकारी व कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळे आयुक्तांच्या उपाययोजनांवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. मनपाच्या व काही खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कचरा घनकचरा वाहून नेणाºया कचराकुंडीत टाकला जात आहे, तसेच मागील काही दिवसांपासून कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वाशी, नेरुळमध्ये रुग्णालय व कोविड केअर सेंटरबाहेर चार ते पाच दिवस कचरा पडून रहात असल्याचेही निदर्शनास आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वैद्यकीय कचरा वाहून नेण्याचा ठेका दिला आहे. या ठेक्याची मुदत संपली असून, संबंधितांना अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नाही. यामुळे कचरा वेळेत उचलला जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. आयुक्त अभिजीत बांगर यांनी तत्काळ हा प्रश्न सोडवावा. याला जबाबदार असणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
‘लोकमत’ने उठविला आवाज
च्पीपीई किट व कोविड रुग्णालयातील कचरा रोडवर व कचराकुंडीत टाकला जात असल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वीही दोन वेळा निदर्शनास आणून दिले होते. सानपाडा व सायन-पनवेल महामार्गावरील वैद्यकीय कचºयाविषयी छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित केले होते.
कोविड रुग्णालयातील कचरा घनकचरा घेऊन जाणाºया कुंड्यांमध्ये टाकला जात आहे. हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- दिव्या गायकवाड,
माजी आरोग्य समिती सभापती