CoronaVirus News: कोविड पॉझिटिव्ह महिलेची पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सुखरूप प्रसुती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 11:40 PM2021-01-08T23:40:59+5:302021-01-08T23:41:21+5:30

आई, नवजात मुलीची प्रकृती उत्तम; मुलीची कोविड चाचणी अद्याप शिल्लक

corona Positive Woman Delivers baby Safely at Panvel Sub District Hospital | CoronaVirus News: कोविड पॉझिटिव्ह महिलेची पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सुखरूप प्रसुती 

CoronaVirus News: कोविड पॉझिटिव्ह महिलेची पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सुखरूप प्रसुती 

Next

वैभव गायकर ,पनवेल :पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी 2 वाजुन 14 मिनिटांच्या सुमारास कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सुखरूप प्रसुती करण्यात आली. जन्माला नवजात मुलीची प्रकृतीदेखील उत्तम आहे.पनवेल मध्ये प्रथमच अशाप्रकारे कोविड पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ अरुणा पोहरे ,डॉ संजय गुडे,डॉ प्रियांका  यांच्यासह शुभांगी गलांडे व भाग्यश्री या परिचारिका यावेळी उपस्थित होत्या. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम आहे.प्रसूती नंतर महिलेला रक्त चढविण्यात आले आहे. बाळाची अद्याप कोविड टेस्ट करण्यात  आलेली नाही.

Web Title: corona Positive Woman Delivers baby Safely at Panvel Sub District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.